Raju Shetti : मुंबईचा दूध पुरवठा रोखू ,राजू शेट्टी;४० रुपये हमीभावाचा पुनरुच्चार

राज्य सरकारने दुधाला ४० रुपये हमीभाव जाहीर करावा; अन्यथा अधिवेशनानंतर सोमवारपासून (ता. १६) आंदोलनाची तीव्रता वाढवू. मुंबईचे नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडत नाही.
Raju Shetti
Raju Shettisakal
Updated on

राहुरी (जि.अहमदनगर) : ‘राज्य सरकारने दुधाला ४० रुपये हमीभाव जाहीर करावा; अन्यथा अधिवेशनानंतर सोमवारपासून (ता. १६) आंदोलनाची तीव्रता वाढवू. मुंबईचे नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडत नाही. मुंबईचा दूध पुरवठा रोखू, ’’असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

राहुरी येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले की, दुग्धविकास मंत्र्यांनी कधी बैठक घेतली माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी उभ्याने निवेदने घेतली. केंद्र सरकारची आयात-निर्यातीची धोरणे चुकली. कांदा, बासमती तांदूळ, साखरेची निर्यात बंदी केली. सोयाबीन पेंड, पामतेल, कापूस, मका आयातीमुळे शेतमालाचे भाव घसरले. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात शेतमाल विक्री करावा लागला, असे सांगत केंद्राच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

‘‘शेकडो उद्योगपतींचे मागील दहा वर्षांचे १४ लाख ५६ हजार कोटींचे कर्ज बँकांनी ‘राईटऑफ’ केले. शेतकऱ्यांचे अडीच-तीन लाख कोटी कर्ज ‘राईटऑफ’ केले ८० कोटी शेतकऱ्यांचे सात-बारा उतारे कोरे होतील. केंद्र सरकारची प्रधानमंत्री फसल विमा योजना नव्हे, तर प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना वाटत आहे. केंद्र व राज्य सरकार विमा कंपन्यांना जेवढे पैसे भरते, ते थेट शेतकऱ्यांना दिले, तरी शेतकरी समाधानी होईल,’’ असे शेट्टी म्हणाले.

माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.