नागपूर ते गोवा या ८०५ किमी लांबीच्या शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आता माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील या रस्त्यासाठीच्या भूसंपदनाला कडक शब्दात विरोध दर्शवला आहे. तिसऱ्या आघाडीसंबंधी पुण्यातील बैठकीआधी बोलताना त्यांनी, रक्ताचे पाट वाहतील पण भू संपादन होऊ देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.