महाविकास आघाडीत राहण्याचा फेरविचार करणार,राजू शेट्टींचा इशारा

विमा कंपनीत खूप मोठे स्कॅंडल असून यात राज्यातील उच्चपदस्थ आहेत, असा आरोपी ही शेट्टी यांनी केला.
Raju Shetti
Raju Shettiesakal
Updated on

अर्धापूर (जि.नांदेड) : इंधनाच्या किंमतीत दररोज वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या एक रक्कमी एफआरपी मिळत नाहीत. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारीत आहे. शेतकऱ्यांच्या व‌‌ नागरिकांच्या समस्यांवरील लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच केंद्र व राज्य शासन आर्यन खान, समीर वानखेडे प्रकरणं प्रसारमाध्यमांना हाताशी धरून चालवले जात आहे. महाआघाडी (Mahavikas Aghadi) सोबत राहण्याचा फेरविचार राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात येईल अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे‌ नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. विमा कंपनीत खूप मोठे स्कॅंडल असून यात राज्यातील उच्चपदस्थ आहेत, असा आरोपी ही शेट्टी यांनी केला. अर्धापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादित करण्यात आलेल्या शेत जमिनीला योग्य (Nanded) मोबदला मिळण्यासाठी शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता.

Raju Shetti
ST Strike : उमरग्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ४५ लाखांचे नुकसान

ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता‌ पार्डी येथील शेतकऱ्यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार सोहळ्यानंतर राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, विमा कंपनी ‌‌‌‌‌‌‌‌ही शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही. पिक कापणी पद्धत सदोष आहे. त्यामुळे उंबरठा उत्पन्न चुकीचे येते. या कंपनीत खूप मोठा भ्रष्टाचार आहे. आम्ही वेळोवेळी आवाज उठविला आहे. विमा कंपनीचा गैरकारभार लवकरच बाहेर काढण्यात येईल. जातीवादी भाजपचे सरकार येऊ नये म्हणून आम्ही महाआघाडी सोबत गेलोत. केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या व ‌‌‌‌‌‌नागरिकांच्या समस्यांना बगल देत आहे. या दोन्ही सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांना ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चार टप्प्यांत एफआरपी देणे चुकीचे आहे. कारखानदार ऊस व‌ साखरेचे चोरी करतात असा आरोप‌ शेट्टी यांनी केला. त्यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोफळे, रवीकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष हानुमंत राजेगोरे, हरिभाऊ कोंढेकर, किसनराव देळुबकर, सदाशिवराव देशमुख, दादाराव शिंदे, पंजाबराव देशमुख, विठ्ठलराव देशमुख, शेकुराव हापगुंडे, माजी निळकंठ मदने, हानूमंत देशमुख व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.