Shivsena: शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर; 'या' बड्या नेत्याला मिळाली संधी

Rajya Sabha candidature announced by Shinde's Shiv Sena: शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर; या नेत्याला मिळाली संधी
cm Eknath Shinde
cm Eknath ShindeSakal
Updated on

शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांना संधी दिली आहे. काही दिवसांपुर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांनी राज्यसभेवर पाठविलेल्या सहा जणांची मुदत २ एप्रिलला संपणार आहे. यासाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. यात माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन (सर्व भाजप), खासदार अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट) व कुमार केतकर (काँग्रेस) यांचा समावेश आहे.

भाजपकडून देखील तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) कडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

cm Eknath Shinde
Rajya Sabha candidates by BJP: अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर, राणेंचा पत्ता कट

भाजपकडून ‘या’ नेत्यांना राज्यसभेची मोठी संधी

भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी यांची नावे आहेत. महाराष्ट्रातून अजित गोपछडे यांना देखील भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, मंत्री नारायण राणे यांना पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे नाव देखील यादीमध्ये नाहीये.

cm Eknath Shinde
Vibhakar Shstri: भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शात्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नव्हते. मात्र, आज तीन नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजपने पक्षातील पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांच्यासह आठ जणांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले होते.

cm Eknath Shinde
Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.