Rajya Sabha Election : 'सपा'नं वाढवलं CM उद्धव ठाकरेंचं टेन्शन!

समाजवादी पार्टीनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सवाल विचारले आहेत.
Rajya Sabha Election 2022 News
Rajya Sabha Election 2022 Newssakal
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छोटे घटक पक्ष आणि अपक्ष आमदरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. समाजवादी पार्टीनं यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून यावर उत्तर मागवलं आहे. त्यानंतर आपण मतदानाचा विचार करु असं, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी म्हटलं आहे. यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढलं आहे. (Rajya Sabha Election CM Uddhav Thackeray tension increased by MVA alliance parties)

Rajya Sabha Election 2022 News
ठाकरेंच्या निर्णयाने मंत्रिपदावर गदा? विधान परिषदेसाठी सेनेचं धक्कातंत्र

अबू आझमी म्हणाले, "राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता. यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं असून यासंदर्भात काही प्रश्न विचारले आहेत. माझ्या या पत्राला उत्तर मिळाल्यानंतर आम्ही विचार करु की, राज्यसभेत कोणाला मत द्यायचं. महाविकास आघाडीला आमचा अजूनही पाठिंबा आहे, पण माझ्या प्रश्नांची उत्तर मला आधी मिळायला हवीत"

Rajya Sabha Election 2022 News
पत्नीसह तीच्या आईवर जावयाचा न्यायालयाच्या आवारात गोळीबार; पत्नी जागीच ठार

उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की, मी तीन वर्षे चुकीच्या लोकांसोबत होतो, जातीयवादी लोकांच्यासोबत होतो. आता आम्ही योग्य लोकांसोबत आहोत. यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. पण अडीच वर्षात त्यांनी काय केलंय? मुस्लिमांच्या प्रश्नांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु इच्छितो पण उद्धव ठाकरेंना यासाठी वेळ नाही. ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत, त्यामुळं मी त्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या एक नवहिंदुत्ववाद सुरु झालाय. भाजपात आणि शिवसेनेत सर्वात मोठा हिंदुत्वावादी कोण आहे, अशी स्पर्धा सध्या सुरु आहे. औरंगाबाद शहराचं नाव बदलल्याचा घाट घातला जात आहे. जुन्या शहरांची नाव बदलण्यानं काय होणार आहे त्यापेक्षा नवी शहरं वसवा. नाव बदलून कोणाला नोकरी मिळणार आहे का? आपण तर सेक्युलर होतात ना? मग याची व्याख्या नक्की काय आहे? हे सांगा, असे सवालही आझमी यांनी केले आहेत.

सपाच्या पत्रात नक्की काय म्हटलंय?

महाविकास आघाडी सरकारनं गेल्या अडीच वर्षात मुस्लिमांसाठी काय केलं? मुस्लीम आरक्षण, हज कमिटीच्या सीईओ पदाची नियुक्ती, अल्पसंख्यांक विभागासाठी निधी या विविध मुद्द्यांचा सपानं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.