संजय राऊत कोण, मला माहित नाही; राऊतांचं नाव घेताच उदयनराजे का संतापले?

Udayanraje Bhosale on Sanjay Raut
Udayanraje Bhosale on Sanjay Rautesakal
Updated on
Summary

महाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान आणि कर्नाटक या चार राज्यातील राज्यसभा निवडणुका आज होत आहेत.

सातारा : महाराष्ट्रासह (Maharashtra) हरियाणा, राजस्थान आणि कर्नाटक या चार राज्यातील राज्यसभा निवडणुका (Rajya Sabha Election) आज होत आहेत. या चारही राज्यातील राज्यसभेच्या 16 जागांसाठी आज 10 जून रोजी मतदान होत आहे. त्यामुळं या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलंय. तर 11 राज्यांतील 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानात अधिकचे उमेदवार उभे राहिल्याने या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रात तर तब्बल 23 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. (Udayanraje Bhosale on Sanjay Raut)

दरम्यान, राज्यात राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. शिवसेना आणि भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. त्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. शिवसेना नेते संजय राऊतही विरोधकांचा खरपूस समाचार घेत आहेत.

Udayanraje Bhosale on Sanjay Raut
भाजपच्या बोलघेवड्या नेत्यांना बसणार लगाम; 38 नेत्यांची यादी तयार

मध्यंतरी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले एका कार्यक्रमाला उपस्थित झाले होते, त्यावेळी पत्रकारांनी उदयनराजेंना संजय राऊतांच्या टीकेवर प्रश्न विचारला. त्यावेळी उदयनराजेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

Udayanraje Bhosale on Sanjay Raut
राष्ट्रपती कसा निवडला जातो, खासदार-आमदारांच्या मताची किंमत काय?

उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांना त्यांच्या स्टाईलमध्ये इशारा दिलाय. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण, आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळं कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच', असा इशाराही त्यांनी दिलाय.

Udayanraje Bhosale on Sanjay Raut
भडकाऊ भाषणं करणाऱ्या असदुद्दीन ओवैसी, स्वामी नरसिंहानंदांवर गुन्हा दाखल

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत हे शिवेंद्रसिंहराजे यांना प्रत्युत्तर देताना म्हणाले होते की, 'संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय हा छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करू नये. भाजपला इतकंच वाटत होतं तर त्यांनी संभाजीराजे यांना 42 मतं द्यायला पाहिजे होती.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.