पुणेः राज्यसभेसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपने बुधवारी तिघा जणांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामध्ये अगदी कालच म्हणजे मंगळवारी भाजपत गेलेले अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. चव्हाणांसोबत भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर सगळ्यात चर्चेत असलेलं नाव म्हणजे मेधा कुलकर्णी.
मागच्या पाच वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या मेधा कुलकर्णी यांचं भाजपने एक प्रकारे पुनर्वसनच केलं आहे. २०१९मध्ये त्यांचा हक्काचा कोथरुड मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या.
२०१९ नंतरही पक्षाने त्यांना विधान परिषद आणि राज्यसभेसाठी डावललं होतं. परंतु आता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला आहे. भाजप ब्राह्मणांना डावलत असल्याची एक चर्चा मागच्या काही दिवसांपासून पुण्यात सुरु आहे. शिवाय भाजपकडून जुन्यांना डावलण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचंही दिसून येतं आहे. या सगळ्यांवर भाजपने मात करत मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी भाजपने कोथरुड मतदारसंघ रिकामा केल्याचंही यातून स्पष्ट होतंय.
ज्या मेधा कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी निश्चित केली आहे, त्या नेमक्या आहेत कोण? असा प्रश्न उपस्थित होतोय. तर मेधा कुलकर्णी ह्या २०१९पूर्वी कोथरुड मतदारसंघाच्या आमदार होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुण्यात प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्या नगरसेविका म्हणून निवडून गेल्या. २०१४ मध्ये त्यांनी ७० हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
२०१९ मध्ये भाजपने ऐनवेळी सेफ मतदारसंघ म्हणून कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर मेधा कुलकर्णी पक्षनेतृत्वार नाराज असल्याचं अनेकदा दिसून आलं. पुण्यात चंद्रकांत पाटील गट आणि मेधा कुलकर्णी गट, असे दोन गट मागच्या पाच वर्षांपासून दिसून आले. आता पक्षाने मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन एकाच दगडात तीन ते चार साध्य सिद्ध करुन घेतले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.