शरद पवारांसह उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ, राजीव सातव यांची मराठीतून शपथ

शरद पवारांसह उदयनराजे भोसलेंनी घेतली खासदारकीची शपथ, राजीव सातव यांची मराठीतून शपथ
Updated on

मुंबईः  राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला. 

देशात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनच्या काळात संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. दरम्यान या सोहळ्यासाठी आज संसदेची दार उघडण्यात आली. 

देशभरातील एकूण ६२ खासदार निवडून आले असून त्यांचा शपथिविधी सोहळा हा अधिवेशनात पार पडणार आहे. आज केवळ काही मोजक्याचं नेत्यांनी शपथ घेतली. यामध्ये  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या या खासदारांनी घेतली शपथ 

  • शरद  पवार
  • उदयनराजे  भोसले
  • प्रियंका विक्रम चतुर्वेदी
  • डॉ. भागवत किशनराव  कराड
  • राजीव सातव
  • रामदास आठवले

उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पवारांना मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि साताऱ्यातून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली होती. मात्र शरद पवार यांनी साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आणि आपले खास विश्वासू  श्रीनिवास पाटील यांनी मैदानात उतरवले. शरद पवारांची मेहनत फळास आणि राजेंचा पराभव झाला.  त्यामुळे उदयनराजेंनी राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडे आधीच अट घालून ठेवली होती. अखेर आज उदयनराजे यांनी पुन्हा एकदा राज्यसभा खासदारीकीची शपथ घेऊन पुन्हा मैदानात उतरलेत.

Rajya sabha mps took oath ceremony  july 22 priyanka chaturvedi Sharad pawar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()