मुंबई : येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार असून, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. तर. दुसरीकडे मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आले आहे. मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी देशमुख यांच्याकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे, असे देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी सांगितले.
सिंग म्हणाले की, येत्या 10 जून रोजी राज्यसभेसाठी मतदान पार पडणार असून, यासाठी मतदान करता यावे यासाठी देशमुख अर्ज दाखल करणार आहेत. परंतु, सध्या सुट्ट्यांमुळे न्यायालयांचे कामकाज बंद असून, ६ जून रोजी ते सुरू होणार आहेत. त्यानंतर यासंबंधी परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे. तर दुसरीकडे, नवाब मलिक यांच्या कायदेशीर टीमला अद्याप मतदानासाठी अर्ज दाखल करण्याबाबत मलिक यांच्याकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. मलिक यांनीही आरएस व्होटिंगसाठी कोर्टाची परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केला असण्याची शक्यता आहे पण ते कधी करणार हे अद्याप ठरलेले नाही.
भुजबळ, कदम यांना मिळाली होती परवानगी
2017 मध्ये, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तसेच रमेश कदम यांनी मुंबई न्यायालयात जाऊन राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मागितली होती. भुजबळ यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात खटला चालवला जात होता, तर कदम यांच्यावरही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे सरकारी पैसे बुडवल्याचा आरोप होता. भुजबळांना कनिष्ठ न्यायालयाने परवानगी दिली, तर कदम यांना मतदानासाठी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी दिली होती. या दोघांनी संबंधित कारागृहातून बाहेर येत विधानसभेत नेण्यात आले जेथे त्यांनी मतदान केले होते. तर, मतदानानंतर दोघांनाही पुन्हा कारागृहात नेण्यात आले होते. याच पद्धतीने मलिक आणि देशमुख यांना परवानगी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.