Rajyasabha Election:...अन् संजय राऊत थोडक्यात बचावले!

शेवटच्या फेरीत १० अपक्षांची मतं फुटल्याने महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.
Sanjay Raut
Sanjay RautSakal
Updated on

कालचा दिवस महाराष्ट्रासाठी मोठा रंगतदार ठरला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं आणि त्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला. अगदी अटीतटीच्या या लढतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा मोठा पराभव झाला तर संजय राऊत थोडक्यात बचावले आहेत. (Shivsena Sanjay Raut won Rajyasabha Election 2022)

Sanjay Raut
संजय पवारांचा पराभव सतेज पाटलांच्या जिव्हारी; काय आहे मुन्ना विरुद्ध बंटी वाद?

राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल मतदान पार पडलं. यासाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपाचे पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, शिवसेनेचे संजय पवार, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. त्यापैकी पीयूष गोयल यांना सर्वच्या सर्व ४८ मतं मिळाली आहेत.

Sanjay Raut
Rajyasabha Election Result: आमच्या विजयाने ते बावचळलेत - फडणवीस

तर अटीतटीच्या या लढतीमध्ये संजय राऊतांना थोडक्यात विजय मिळाला आहे. त्यांना ४१ मतं मिळाली आहेत. तर भाजपाच्या अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना सर्वाधिक ४८ मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेचे कोल्हापुरातले उमेदवार संजय पवार यांना ३९ मतं मिळाली असून त्यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक हे ४१ मतांनी विजयी झाले आहेत.

Sanjay Raut
शिवसेनेने एक जागा गमावली; संजय राऊत म्हणाले...

सहा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीतल्या पाच जागा निश्चित होत्या. मात्र सहाव्या जागेसाठी लढत होती. यासाठी भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार आमनेसामने होते. या लढतीमध्ये पहिल्या फेरीत संजय पवारांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली तर महाडिकांना २७ मतं मिळाली. मात्र महाविकास आघाडीला अपेक्षित १० मतं फुटल्याने धनंजय महाडिकांना पहिल्या पसंतीची मतं मिळाली. त्यामुळे संजय पवार केवळ २ मतांनी हरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.