रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा सण असतो. बहीण भावातील नात्यातील सलोखा जपणारा हा सण असतो. सर्वसामान्यांप्रमाणेच राजकारणी देखील हा सण तितक्याच आत्मियतेनं साजरा करतात. (Rakhi Purnima)
महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक बहिण भावाच्या जोड्या आहेत ज्यांनी राजकीय वर्तुळात अधिराज्य गाजवले. यातलं भरारीचं नाव म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या बहिण भावाचं नातं खूप हळवं आहे, या गोष्टीचा प्रत्यय अनेकदा येतो. (raksha bandhan special ncp leader ajit pawar and supriya sule love bonding)
एका मुलाखतीदरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांनी अजित पवार आणि सुप्रियाताई यांच्या नात्यांबद्दल बोलताना म्हणाल्या होत्या की या दोघा बहिणभावाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगदी अजित पवार सुप्रियाताईंवर जीव ओवाळून टाकतात.
असाच एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, “अजित पवार यांच्या कारखान्याच्या डायरेक्टरसाठीच्या पहिल्या निवडणूकीच्या निकालाच्या दिवशी सुप्रियाताईंनी उपवास केला होता. केवळ केवळ दादा जिंकावे म्हणून. एवढं त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे”
अजितदादासोबतच्या नात्याबद्दल बोलताना एका मुलाखतीत सुप्रिया सुळे सांगतात. “अजितदादा खूप हळवा आहे. अगदी ओव्हर इमोशनल. जरी आमच्याकडे कोणी आजारी असलं की कधी हॉस्पिटलमध्ये दादा आला की तो गॅसवर असतो. तो आयसीयू, रुम मध्ये जात नाही, त्याला ते झेपत नाही, इतका तो हळवा आहे.”
त्या पुढे सांगतात की दादा जितका हळवा आहे तितकाच त्याचा धाक सर्वांना असतो. त्याला सर्व परफेक्ट आणि वेळेत तयार हवं असतो. अगदी डेकोरेशनपासून सर्व नीटनीटके हवं असतं.
दादांच्या सोबतचा एक किस्सा सुप्रिया सुळे सांगतात, "एकदा मी डायनिंग टेबलवर सर्वांना पालेभाजी वाढत होती आणि दादाला वाढताना थोडीशी पालेभाजी बाहेर पडली तेव्हा दादा मला म्हणाला होता की लग्नाला एवढे वर्षे झाली तरी तुला पालेभाजी वाढता येत नाही, यावर मी त्याला मिश्किलपणे म्हणाली होती माझ्या पालेभाजीचा माझ्या लग्नाशी काय संबंध.? आणि यावर आबा खुप हसले होते. यावरुन दादाला किती परफेक्ट हवं असतं, हे तुम्ही समजू शकता.”
दादाची शिस्त आम्हाला खुप आवडते. कारण आम्ही खुप बेशिस्त आहोत. म्हणून दादाने आम्हाला रागवले पाहिजे, असा आमचा अट्टाहास असतो.
अनेकदा अजित पवारही सुप्रिया सुळे यांच्या कामाचं कौतुक करताना थकत नाही. अनेक कार्यक्रमात माझ्या बहिणीने हे काम केलं, सुप्रियाने हे काम चांगल केलं असे ते सहज बोलतात.
राजकारणात किती वादंग निर्माण झाले असले तरी या बहिण भावाचं नात कायम तसंच राहलं. या राजकारणात अनेक बहिण भाऊ सत्तेच्या मोहापायी एकमेकांच्या विरोधात जाताना सर्वांनी पाहिले, पण तिथेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे सारखं भावंड एकमेकांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देतात. बहिण भावाचा गोडवा जपत तितक्याच ताकदीने जनतेसमोर उभे राहतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.