Special Train For Ayodhya: रामभक्तांसाठी खुशखबर! मुंबईहून १६ 'आस्था से अयोध्या स्पेशल ट्रेन' धावणार

रामभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतीय रेल्वे देशभरातून आस्था ते अयोध्या अशी विशेष प्रीपेड ट्रेन चालविणार आहे.
 Special Train For Ayodhya: रामभक्तांसाठी खुशखबर! मुंबईहून १६ 'आस्था से अयोध्या स्पेशल ट्रेन' धावणार
Updated on

46 Special Trains to Ayodhya from Mumbai: अयोध्या येथील मंदिरात प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संप्पन झाला. त्यानंतर प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांचे जत्थे अयोध्येला जाणार आहेत. रामभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतीय रेल्वे देशभरातून आस्था ते अयोध्या अशी विशेष प्रीपेड ट्रेन चालविणार आहे. यामध्ये मुंबईतून १६ गाड्या अयोध्याच्या दिशेने धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या पाचही विभागांतून एकूण ४६ आस्था ते अयोध्या विशेष प्रीपेड ट्रेन चालवणार आहे. यापैकी ३० (१५ अप आणि १५ डाऊन) गाड्या मुंबई सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत धावतील. पहिली आस्था ते अयोध्या स्पेशल ट्रेन २९ जानेवारी २०२४ रोजी सीएसएमटी येथून सुटेल. आस्था से अयोध्या विशेष ट्रेनच्या पूर्ण खर्च भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद उचलणार आहे. ही ट्रेन मध्य रेल्वे चालवणार आहे तर प्रवाशांसाठी खानपानाची व्यवस्था आयआरसीटीसीकडून करण्यात येणार आहे.

मुंबईहून १६ स्पेशल गाड्या -

सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत एकूण १६ आस्था ते अयोध्या स्पेशल रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रात्री १०. ३५ वाजता सुटेल आणि सुमारे ३४ तास ५५ मिनिटे प्रवास केल्यानंतर सकाळी ९.३० वाजता अयोध्या स्थानकावर पोहोचेल. या परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन अयोध्येहून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि १२. ४० वाजता मुंबईला पोहोचेल. (Latest Marathi News)

नाश्ता जळगावात, दुपारचे जेवण भोपाळमध्ये -

मुंबई ते अयोध्या दरम्यानच्या प्रवासादरम्यान राम भक्तांना जळगावमध्ये नाश्ता, खंडवामध्ये दुपारचे जेवण, भोपाळमध्ये रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये नाश्ता देण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान आयआरसीटीसी शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्ता देईल.

 Special Train For Ayodhya: रामभक्तांसाठी खुशखबर! मुंबईहून १६ 'आस्था से अयोध्या स्पेशल ट्रेन' धावणार
Maratha Reservation: लोणावळ्यात विजयाचा गुलाल उधळा, दीपक केसरकरांचे मराठा बांधवांना आवाहन, वक्तव्याचा अर्थ काय?

४६ आस्था ते अयोध्या विशेष गाड्या

सीएसएमटी -१६ट्रेन

पुणे- १६

नागपूर- ४

दर्शन नगर- ७

अमरावती-२

कोल्हापूर-१

----------

एकूण -४६

 Special Train For Ayodhya: रामभक्तांसाठी खुशखबर! मुंबईहून १६ 'आस्था से अयोध्या स्पेशल ट्रेन' धावणार
Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या विरोधात FIR, 2 वर्षांपर्यंत कारावास अन् दंडाची तरतूद, काय आहे आरोप?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.