Ram Temple History of Ayodhya in Marathi
अयोध्येत 500 वर्षानंतरचे स्वप्न पूर्ण होत आहे. रामलल्ला अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले आहे. मात्र अयोध्येचा अध्याय हा ऐतिहासिक आहे. या अध्यायात अनेक किस्से आहेत. श्रीरामची अनेक रूपे आहेत. त्यानुसार प्रत्येकाची 'राम' समजून घेण्याची पद्धत देखील वेगळी आहे. या देशातील राजकारणात देखील एक 'राम' आहेत. काँग्रसमध्ये असताना देखील एका आमदाराने तत्कालीनप्रवेशित मजकूर २००० अक्षरांपेक्षा अधिक नसावा!!!पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात जाऊन बाबरी मशीदीत रामाची मूर्ती ठेऊन अभिषेक केला होता. ते काँग्रेसचे आमदार कोण होते हे आपण जाणून घेऊया.
सर्वात आधी 22-23 डिसेंबर 1949 च्या रात्री रामललाच्या मूर्तीची गर्भगृहात गुप्तपणे स्थापना करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना या संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री वल्लभभाई पंत यांना लिहिलेल्या पत्रातून रामलल्लाच्या पुतळ्याबाबत त्यांचे मत काय होते हे स्पष्ट केले.
जवाहरलाल नेहरू यांनी पत्रात लिहले, "प्रिय पंतजी, अयोध्येत मशिदी आणि मंदिरांबाबत जे काही घडले ते अत्यंत चुकीचे होते, परंतु सर्वात खेदाची गोष्ट म्हणजे त्यात आपलेच काही लोक सामील होते, ज्यांच्या संमतीने हे सर्व घडले."
उल्लेखनीय आहे की ज्या पाच साधूंनी गर्भगृहात मूर्तीला अभिषेक केला होता, त्यापैकी बाबा राघव दास हे 1948 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अयोध्येतून आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांच्या निवडणूक प्रचारात सर्वाधिक सक्रिय तेच गोविंद बल्लभ पंत होते. ज्यांना पंडित नेहरू मुर्ती काढून टाकण्यासाठी विनंती करत होते.
बाबा राघव दास यांचा जन्म 12 डिसेंबर 1896 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता. ते आठ मुलांपैकी सर्वात लहान होते आणि त्यांचे नाव राघवेंद्र होते. 1902-1904 च्या प्लेग महामारीत त्याचे संपूर्ण कुटुंब मरण पावले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना मुंबईत प्राथमिक शिक्षण घेणे भाग पडले. मुंबईतील शिक्षणानंतर, त्यांनी सिद्ध गुरूच्या शोधात शहर सोडले. त्यांनी काशीसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या पण काही उपयोग झाला नाही. यानंतर तो गाझीपूरला गेला, तिथे त्याला 'मौनी बाबा' भेटले आणि त्यांच्याकडून हिंदी शिकले. पुढे त्यांनी 'योगिराज अनंत महाप्रभू' यांना आपले गुरू मानले. यानंतर ते अनंत महाप्रभूंच्या गादीचे उत्तराधिकारी झाले आणि त्यांनी बरहज येथे परमहंस आश्रम स्थापन केला. (Ayodhya Ram Mandir News in Marathi)
1921 मध्ये महात्मा गांधी यांनी गोरखपूरचा दौरा केला होता. यावेळी त्यांची बाबा राघव दास यांच्याशी भेट झाली. त्यानंतर बाबा राघव दास भारतीय ,स्वतंत्रता आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी पीडित लोकांची सेवा केली. गांधींजी त्यांना बाबा राघवदास म्हणत. बाबा राघवदास यांच्यासारखे संत स्वतंत्रता आंदोलनात सहभागी झाले तर स्वातंत्र्य मिळवणे सोपे होईल, असे गांधींची म्हणत असत. बाबा राघवदास यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. 1998 राघवदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकीट देखील काढण्यात आले होते.
1948 मध्ये लढवली पोटनिवडणूक -
उत्तर प्रदेशात 1948 मध्ये समाजवादीच्या 13 आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे 13 जागांवर पोटनिवडणूक झाली. अयोध्या – तेव्हा फैजाबाद म्हणून ओळखले जात होते. फैजाबादची निवडणूक चर्चेचा विषय ठरली कारण या ठिकाणी समाजवादी विचारवंत आचार्य नरेंद्र देव येथून मैदानात होते. राजीनामा देणाऱ्या समाजवादी आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांचा पराभव करणे काँग्रेससाठी आव्हानात्मक ठरले. त्यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने बाबा राघव दास यांना उमेदवारी दिली. रामजन्मभूमीला पाखंडी लोकांपासून मुक्त करणार हे त्यांचे एक वचन होते. पोटनिवडणुकीत आचार्य नरेंद्र देव यांना 4,080 तर राघव दास यांना 5,392 मते मिळाली. अशा प्रकारे दास 1,312 मतांनी विजयी झाले.
अनंत आश्रमाचे पीठाधीश्वर बाबा राघवदास यांनी 1948 मध्येच अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्याची भविष्यवाणी केली होती. जेव्हा देशाची परिस्थिती मजबूत होईल तेव्हा अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे ते म्हणाले होते. मठाधिपती रामचंद्र दास यांच्या नेतृत्वाखाली संत समाजाच्या लोकांनी बाबांना पहिल्यांदा फैजाबादमधून (अयोध्या) आमदार केले.
राम मंदिर आंदोलनात बाबा राघवदास यांची महत्त्वाची भूमिका होती. अनंतपीठाचे पीठाधीश्वर अंजनेय दास यांनी अमर उजालाला दिलेल्य माहितीनुसार राम मंदिराच्या उद्धारासाठी ऋषीमुनींनी 1948 मध्ये अयोध्येच्या छोटी छावणीचे महंत रामचंद्र दास यांच्या नेतृत्वाखाली बाबा राघवदास यांना आमदार केले होते. गर्भगृहात भगवान श्री रामाचे मूर्ती ठेवण्यात बाबांचे योगदान मानले जाते. तेव्हा त्यांना जोरदार विरोध झाला. (Latest Marathi News)
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्न परिस्थितीमुळे भंग पावल्यानंतर बाबा राघवदास यांच्या सूचनेवरून सत्यव्रत महाराजांनी 1952 मध्ये अनंत आश्रमात अभय राघव मंदिर बांधले. यामध्ये माझौलीच्या राणीने पाठवलेल्या सीताराम, हनुमान आणि राधाकृष्ण यांच्या मौल्यवान मूर्तींना अभिषेक करण्यात आला. जेव्हा वेळ अनुकूल असेल आणि परिस्थिती योग्य असेल तेव्हा भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे बाबा अनेकदा म्हणायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.