वानखेडेंची नोकरी की मलिकांचं मंत्रीपद जातं लवकरच कळेल : आठवले

Ramdas Athawale
Ramdas Athawaleesakal
Updated on
Summary

एनसीबीनं (NCB) आर्यनवर (Aryan Khan) केलल्या कारवाईत पक्षांनी आरोप करण्याचं काहीच कारण नाही.

कऱ्हाड (सातारा) : एनसीबीनं (NCB) आर्यनवर (Aryan Khan) केलल्या कारवाईत पक्षांनी आरोप करण्याचं काहीच कारण नाही. एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्यनवर कारवाई करण्यात आलीय. न्यायालयानंही त्याला जामीन दिलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडं भरपूर पुरावे आहेत, असा अर्थ होतो. मंत्री नवाब मलिक जर अधिकाऱ्यांवर आरोप करत असतील, तर समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) नोकरी जाते की नवाब मलिक (Nawab Malik) यांचं मंत्रीपद जातं हे बघूया, असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आज कऱ्हाड (जि.सातारा) येथे लगावला.

ईडीच्या कारवायांबाबत मंत्री आठवले म्हणाले, केंद्र सरकारचा विनाकारण कोणाला त्रास देणं हा हेतू नाही. ज्या ठिकाणी अनियमितता होते, तेथे एनसीबी कारवाई करते, चौकशी करते. आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ईडीकडून पवारांचे कुटुंब म्हणून त्रास दिला जात नाही. ती चौकशी स्वतंत्ररित्या होत असते, त्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही. केंद्र सरकारनं पवार कुटुंबीयांना त्रास द्या, असे आदेश दिलेले नाहीत. ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केलं आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळावं ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. केंद्रामधून काही होवू शकते का याचा विचार आम्ही करत आहोत.

Ramdas Athawale
उदयनराजे स्वबळावर निवडणूक लढवणार?

ते पुढे म्हणाले, एनसीबीनं आर्यनवर केलल्या कारवाईत पक्षांनी आरोप करण्याचं काहीच कारण नाही. एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे आर्यनवर कारवाई करण्यात आलीय. न्यायालयानंही त्याला जामीन दिलेला नाही. त्यामुळे एनसीबीकडं भरपूर पुरावे आहेत, असा अर्थ होतो. त्यानंतर एनसीबीनं अनेकांना धडाधड अटक केलीय. एनसीबी ही स्वतंत्र व्यवस्था आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर ड्रग्सचं स्मगलिंग करुन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरवठा केला जातो, हे पुढं आलं. मंत्री नवाब मलिक जर अधिकाऱ्यांवर आरोप करत असतील, तर समीर वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिक यांचं मंत्रीपद हे बघूया, असाही टोलाही त्यांनी हाणला.

Ramdas Athawale
मला कोणाला मोठं करणं पसंत नाही : उदयनराजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.