Maratha Reservation: आठवलेंचा सदावर्तेंना सबुरीचा सल्ला! म्हणाले, सर्वच मराठ्यांना आरक्षण...

पंतप्रधान मोदी शिर्डीत आरक्षणावर का काही बोलले नाहीत? याचं कारणही त्यांनी सांगितलं.
Athavale_Sadavarte
Athavale_Sadavarte
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या आरक्षणाला अॅड. गुणरत्न सादवर्ते यांनी जाहीररित्या विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं नाराज झालेल्या मराठा तरुणांनी नुकतीच त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी सदावर्ते यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. (Ramdas Athawale advice to Gunaratn Sadavarte Maratha reservation not for all)

जरांगेंनी विरोध करु नये

आठवले म्हणाले, "एससी-एसटी-ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मनोज जरांगे यांनी शांततेत उपोषण सुरु केलं आहे. पण त्यापूर्वी आमच्या मराठा आयाबहिणी आणि तरुणांनी ५ लाख ते १५ लाखांच्या संख्येनं मोर्चे काढले. (Latest Marathi News)

पण ज्याप्रकारे गुणवंत सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. पण माझं म्हणणं असं आहे की, सदावर्तेंनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करता कामा नये. कारण मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सर्वच मराठ्यांना आरक्षण असा नाही. ज्यांचं उत्पन्न आठ लाखांच्या आतमध्ये असेल त्यांना आरक्षण देण्याची मागणी आहे"

Athavale_Sadavarte
Israel-Hamas War: हेरगिरी करणारं 'पेगासिस' आता इस्राइलला करणार मदत! हमासला नमवण्याची तयारी सुरु

मोदींना ते शक्य नाही

आता या पेचातून मार्ग काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल शिर्डीत आले होते तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला काही आदेश दिले नाहीत म्हणून जरांगे नाराज आहेत.

पण मोदी हे पंतप्रधान आहेत. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठा समाज आहे त्याप्रकारे प्रत्येक राज्यात क्षत्रिय समाजाचे लोक राहतात. त्यामुळं पंतप्रधानांना जर आरक्षणाचा विचार करायचा झाला तर त्या सर्व क्षत्रिय समाजाचा विचार करावा लागेल, केवळ मराठा समाजाचा विचार करुन चालणार नाही. (Marathi Tajya Batmya)

Athavale_Sadavarte
Mukhtar Ansari: बाहुबली आमदार मुख्तार अन्सारीला १० वर्षांचा तुरुंगवास, पाच लाखांचा दंड; वाचा काय आहे प्रकरण

ओबीसींप्रमाणं वेगळा प्रवर्ग करावा

त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्र सरकारची ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका आहे. मला वाटतं की ओबीसींप्रमाणं वेगळा प्रवर्ग तयार करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच व्हायला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()