आठवले म्हणाले, चंद्रशेखर राव यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार; पण...

Ramdas Athawale
Ramdas AthawaleRamdas Athawale
Updated on

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी रविवारी (ता. २०) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. दोघांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. यावर बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, चंद्रशेखर राव यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांचे काम हे तेलंगणापर्यंत मर्यादित आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chandrasekhar Rao) यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जी भूमिका मांडायची आहे ती मांडू द्या. ते भेटले तर चांगलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पण भेटले पाहिजे. राव यांचे काम हे तेलंगणापर्यंत मर्यादित आहे. तिसरी आघाडी जरी झाली तरी आम्हाला फरक पडणार नाही, असे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

Ramdas Athawale
उभा ट्रेलर पाहून चालक घाबरला अन् तागडे कुटुंबाला मृत्यूने कवटाळले

पाचही राज्यात एनडीए (NDA) जिंकून येईल हा आमचा संकल्प आहे. पंजाबमध्ये ११७ सीट भाजपला (BJP) मिळेल. कोणीही शिवीगाळीची भाषा वापरू नये. जे सत्तेत आहेत त्यांनी उलट सुलट बोलू नये. कोणाचा बाप काढायची गरज नाही. मी नक्की प्रयत्न करेल की वाद मिटला पाहिजे. भाजप व शिवसेना एकत्र यावच लागेल. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना सांगणार हा वाद मिटला पाहिजे. अनेक वर्षांची मैत्री दुष्मानीमध्ये बदलली आहे. परत मैत्री व्हायला हवी. राजकारणात काहीही होऊ शकते. भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

पुणे महापालिका निवडणुकीत २० ते २५ जागा रिपब्लिकन पार्टीला मिळाल्या पाहिजेत. महानगरपालिका निवडणूक एप्रिलच्या शेवटी होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंदाज मांडला असेल, असेही रामदास आठवले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.