Ramdas Athawale vs Prakash Ambedkar
Ramdas Athawale vs Prakash Ambedkaresakal

'प्रकाश आंबेडकर महायुतीत आले असते, तर आता ते एखाद्या खात्याचे मंत्री झाले असते'; शिवसेना-भाजप युतीबाबतही आठवलेंचा गौप्यस्फोट

Ramdas Athawale : शिवसेना-भाजपची युती (Shiv Sena-BJP Alliance) टिकण्यासाठी प्रत्येकी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मी भाजपला दिला होता.
Published on
Summary

लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले; परंतु अपेक्षित नाही मिळाले. संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, अशा अनेक अफवा पसरवण्यात आल्याने त्याचा फटका महायुतीला बसला.

रत्नागिरी : शिवसेना-भाजपची युती (Shiv Sena-BJP Alliance) टिकण्यासाठी प्रत्येकी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मी भाजपला दिला होता. माझा प्रस्ताव मान्य केला असता, तर हे सर्व घडलेच नसते, असा गौप्यस्फोट केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री आणि आरपीआय गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला.

जिल्ह्यात १९९५ ते २०२४ पर्यंत अॅट्रॉसिटीचे प्रकार केवळ ३०५ आहेत. याचा अर्थ रत्नागिरीत दलितांशी संबंध चांगले आहेत, असेही ते म्हणाले. रामदास आठवले यांचा ‘आरपीआय’तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यानिमित्त शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Ramdas Athawale vs Prakash Ambedkar
Chandrakant Patil : 'तुमचा नेता अमेरिकेत बसून आरक्षण घालवतो म्हणतोय अन् आम्ही आरक्षण घालवणार असं सांगत सुटलाय'

आठवले म्हणाले, अनेक वर्षांनंतर रत्नागिरीत येण्याची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले; परंतु अपेक्षित नाही मिळाले. संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, अशा अनेक अफवा पसरवण्यात आल्याने त्याचा फटका महायुतीला बसला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बाहेर गेल्यानंतर देशाची बदनामी करत आहेत. ‘आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण रद्द करू’, अशी भाषा त्यांनी वापरली. रिपब्लिकन पक्ष आणि महायुतीने राहुल गांधीच्या या विधानाचा निषेध केला.

राहुल गांधी म्हणतात, लोकशाही धोक्यात आली आहे; परंतु तुमच्या ९९ जागा आणि विरोधी पक्षाला २३४ जागा मिळाल्या याचा अर्थ लोकशाही धोक्यात आहे, असा होईल का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान धोक्यात नाही. ते बदलण्याचा अधिकार कोणाला नाही; परंतु अफवा पसरण्याचे काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. विधानसभेला त्यांचा हा डाव उधळून टाकू आणि महायुतीला चांगले बहुमत मिळवून देऊ.

Ramdas Athawale vs Prakash Ambedkar
'या' सात मतदारसंघांत विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून मोठी फिल्डिंग; ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा उभारण्याचा निर्धार!

रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांबाबत चर्चा केली असता काही चांगल्या गोष्टी एकायला मिळाल्या. जिल्ह्यात १९९५ ते २०२४ पर्यंत अॅट्रॉसिटीच्या केसेस ३०५ आहेत. याचा अर्थ रत्नागिरीत दलितांशी संबंध चांगले आहेत. हे प्रमाण १ टक्क्यापेक्षा कमी आहे. सामाजिक न्यायभवनाचा देशाचा आराखडा १ लाख ५९ हजार कोटींचा होता. आता तो १ लाख ६२ हजार कोटींचा आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला १९ कोटी देण्यात आले आहेत. शेड्यूल कास्ट ४ टक्के प्रमाण आहे.

आंतरजातीय विवाह १४३ झाले हे चांगले प्रमाण आहे. आयुष्यमान भारत ७०० लाभार्थ्यांना फायदा झाला, तर मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेसाठी ४ लाख ५३ हजार ३४ अर्ज आले आहेत. ३ लाख ३४ हजार मंजूर करण्यात आले आहेत. एका महिन्याला ६० कोटी एका जिल्ह्याला लागणार आहेत. लाडकी बहीण योजना अतिशय धाडसी निर्णय शासनाने घेतला आहे, असे आठवले म्हणाले.

Ramdas Athawale vs Prakash Ambedkar
भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

...तर प्रकाश आंबेडकर मंत्री असते

महाविकास आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग लोकसभेत अयशस्वी ठरला. प्रकाश आंबेडकरांना आम्ही महायुतीमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला होता. ते महायुतीमध्ये आले असते, तर आता ते एखाद्या खात्याचे मंत्री झाले असते, असे स्पष्ट मत सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

नीतेश राणेंनी भूमिकेत बदल करावा

नीतेश राणे हे भाजपचे प्रवक्ते आहेत. मुस्लिम समाजाबद्दल नीतेश राणे यांनी आपली भूमिका बदलायला हवी. नारायण राणे यांनीदेखील समाजातील सर्व घटकांना घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. जे देशद्रोही मुस्लिम आहेत त्याला आमचा विरोध राहील, अशी भूमिका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा नीतेश राणेंनी आपल्या भूमिकेत बदल करावा, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.