प्रकाश आंबेडकरांना आठवलेंची ऑफर, म्हणाले तुमच्या नेतृत्वाखाली काम..

'निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून'
politics
politicsgoogle
Updated on
Summary

'निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून'

'बाळासाहेब आंबेडकर, तुम्ही माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या. मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. समाजाच्या हितासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. रामदास आठवले यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

यावेळी आठवले म्हणाले, बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला एकत्र आणण्याचा चांगला प्रयोग केला. पण लोकसभा, विधानसभेला एकही माणूस निवडून आला नाही. निवडून यायचं असेल तर माझ्याकडून शिका आणि पडायचे असेल तर त्यांच्याकडून, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. रिपब्लिकन पक्षाचे नाव मजबूत करण्यासाठी मी देशभर फिरतो आहे. कुणी वंचितचे नाव देते कोणी इतरांचे. पण मी कायम रिपब्लिकन राहणार असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

politics
शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन, दुबईत हृदयविकाराचा झटका

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप असे चार मोठे पक्ष आणि मनसेही आहे. आपण एकत्र यायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांना माझे नम्र निवेदन आहे की समाजाच्या हितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आपण पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारा, नेतृत्व घ्या मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरेंसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, त्यांनी माफी मागायला हवी. भोंग्याचे सोंग कशासाठी. मुसलमानाच्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावणे बरोबर नाही. आता अयोध्येत राज ठाकरेंना विरोध होत आहेत. त्या लोकांचे म्हणणे चुकीचे नाही. राज ठाकरेंनी माफी मागायला पाहीजे. अंगावर भगवा तुम्ही घातला तुमचा आदर आहे, पण वाद लावण्याचे काम करू नका, असंही त्यांनी सुचवलं आहे.

politics
राज्यात पावसाला सुरुवात, कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात 'अलर्ट'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.