देवेंद्र फडणवीस आहेत उद्याचे मुख्यमंत्री, रामदास आठवले यांची भविष्यवाणी

'फडणवीस यांना सतत माजी मुख्यमंत्री म्हणू नका.'
Ramdas Athawale And Devendra Fadnavis
Ramdas Athawale And Devendra Fadnavisesakal
Updated on

लातूर : देवेंद्र फडणवीस आहेत उद्याचे मुख्यमंत्री, अशी भविष्यवाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या चारोळीतून केली आहे. लातूर (Latur) येथील जेएसपीएम शिक्षण संस्था व महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या वतीने बुधवारी (ता. १३) आयोजित कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. आठवले यांनी शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या संस्थेच्या नावाचा आधार घेत 'कव्हेकर यांच्या संस्थेचे नाव आहे जेएसपीएम, देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) आहेत उद्याचे सीएम' अशी चारोळी सादर करत फडणवीस यांना सतत माजी मुख्यमंत्री म्हणू नका, असे आठवले यांनी आवाहन केले. (Ramdas Athawale Prediction, Devendra Fadnavis Is Chief Minister Of Tomorrow)

Ramdas Athawale And Devendra Fadnavis
औरंगाबादमधील राम नवमी मिरवणुकीचा Viral Video; मशिदीजवळून जाताना 'भाईचारा'

संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी सत्तेवर आले आहेत. काँग्रेसच खरी जातीवादी आहे. काँग्रेसने दोन वेळा आंबेडकरांचा पराभव केला. आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला मोदी यांनी धडा शिकवल्याचे आठवले म्हणाले.

Ramdas Athawale And Devendra Fadnavis
बाहेर देशातून कोळसा आणावा, वीज टंचाईवर दानवेंचा ठाकरे सरकारला सल्ला

मराठवाड्याला काहीच दिले नाही

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणारी पंचवीस हजार कोटींची वॉटर ग्रीडची योजना गुंडाळली. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून ते मराठवाड्याला देण्याची योजना बंद झाली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. सरकारने मराठवाड्याला काहीच दिले नसल्याची टीका फडणवीस यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.