'हिंदू धर्माला मजबूत करण्याचं काम सेनेपेक्षा भाजप अधिक करत'

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, केंद्रीय मंत्री आठवलेंचं आवाहन
Ramdas Athavale
Ramdas AthavaleSakal
Updated on
Summary

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, केंद्रीय मंत्री आठवलेंचं आवाहन

मागील काही दिवसांपासून मनसे राज्याच्या राजकारणात लक्षणीयरित्या सक्रिय झाले आहे. मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीने टीका केली आहे. तसेच यासाठी भाजपाने अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांचा पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. आज मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान पुण्यात होणाऱ्या सभेआधीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी' असं आवाहन केलं आहे. नांदेडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत असताना त्यांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. कट्टर हिंदुत्व कुणाचं आहे हे सिध्द करण्यासाठी सगळ्याच पक्षांची स्पर्धा आहे. माझ्या नजरेतून हिंदू धर्माला मजबूत करण्याचे काम शिवसेनेपेक्षा भाजप जास्त करते, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Ramdas Athavale
'संभाजीराजेंनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला, तर..' CM ठाकरेंचं मोठं वक्तव्य

राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याच्या स्थगितीवर ते म्हणाले, राज यांनी दौरा रद्द केला, याचे स्वागत आहे. हा दौरा त्यांनी रद्द केला ही चांगली गोष्ट आहे. त्याठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करुन जाणे योग्य नाही. उत्तर भारतीयांचं म्हणण्याप्रणाण त्यांनी त्यांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं. राज ठाकरे हे हिंदू आहेत, त्यांना राममंदिर बघायला जाण्याचा अधिकार आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतरच त्याठिकाणी जायला काही हरकत नाही, असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, कट्टर हिंदुत्व कुणाचं आहे हे सिध्द करण्यासाठी सगळ्याच पक्षांची स्पर्धा आहे. माझ्या नजरेतून हिंदू धर्माला मजबूत करण्याचे काम शिवसेनेपेक्षा भाजप जास्त करते. हिंदू धर्माला मजबूत करत असताना इतर धर्मियांना सोबत घेऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' अशी घोषणा घेऊन BJP सार्‍या देशामध्ये मोठ्या प्रमाणात विजय संपादन करत आहे.

Ramdas Athavale
Raj Thackeray Pune Sabha : राज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

पंतप्रधानांच्या या भूमिकेमुळे हिंदू समाज त्यांच्या पाठिशी आहेच, पण इतर समाजही भाजप सोबत आहे. तर दलित समाज हा आठवले आणि मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत आहे. मुस्लिम समाज हा जसा पूर्वी भाजपला विरोध करायचा, तो तेवढ्या प्रमाणामध्ये विरोध करत नाही. त्यामुळे BJP ला मोठ्या प्रमाणात सगळ्या राज्यांमध्ये यश मिळत आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

नांदेडमधील सार्वजनिक कार्यक्रमात मंत्री रामदास आठवले यांना भाजपचे आमदार राजेश पवार यांनी तलवार भेट दिली. ही तलवार आठवले यांनी म्यानातून काढून दाखवली. खुद्द केंद्रीय मंत्र्यांना अशा पध्दतीने तलवार भेट देणे आणि ती स्वीकारणे यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.