लतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती; गरिबांच्या दुःखावर मायेची फुंकर होती - रामदास आठवले
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. कला सास्कृंतिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही लतादीदींना काव्यमय श्रद्धांजली वाहिली आहे. (Lata Didi) त्यांनी ट्वीटरला एक कविता पोस्ट केली आहे.
"भारतरत्न लता मंगेशकर नाव हे राहील अजरामर,
मनामनात गुंजत राहिल गाणकोकिळेचे सुमधुर स्वर,
लतादीदींचा स्मृतिगंध दरवळत राहील भारतभर जगभर..,
लतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती,
दुःखावर औषध म्हणून त्यांच्या गायनाची गरज होती,
गरिबांच्या दुःखावर मायेची फुंकर होती..,
त्यांच्या गायनाने सैनिकांनाही प्रेरणा लाभत होती,
ए मेरे वतन के लोगो, जरा आखों में भरलो पानी..
या गीतातून सदैव ऐकत राहू लतादीदींची वाणी,
गाणं कोकिळा स्वरसम्राज्ञी अजरामर ठरली..
मी वाहतो लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली!
अशी काव्यात्मक शब्दांत दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भावपूर्ण श्रध्दांजली! वाहिली आहे. राज्यासह देशाच्या राजकीय नेत्यांनी सोशल मिडियाद्वारे आदरांजली वाहिली आहे. लतादिदींच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून न निघणारी असल्याची पोस्ट केल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra) शरद पवार, (Sharad Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भावनिक पोस्ट करत श्रद्धांजली वाहिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.