Maharashtra Politics: रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर; म्हणाले ठाकरेंकडून...

प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो आठवलेंची ऑफर
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal
Updated on

गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अशातच काही पक्षांनी एकत्रित येत युती स्थापन करून आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही," असं रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

शिर्डीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पुढे रामदास आठवले म्हणाले कि, 'प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत, मात्र रिपाइं ज्यांच्या बाजूने असते त्यांनाच सत्ता मिळते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो. आपण दोघे मिळून भाजप आणि नरेंद्र मोदींसोबत राहू. तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊ नये, ते कसे आहेत ते मला माहित आहे असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Accident News: बेशिस्त बाईकचालकांमुळे पायी चालणाऱ्यांना डोकेदुखी, भरधाव बाईकच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले तर त्यांचे स्वागतच आहे असं म्हणत रामदास आठवले यांनी ठाकरे आणि आंबेडकरांना ऑफर दिली आहे. त्याचबरोर 'महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमुठ आणि रोज करतेय सगळ्यांची लूट' असा आपल्या खास कवितेच्या शैलीत आठवले यांनी मविआला खोचक टोला लगावला आहे.(Latest Marathi News)

Maharashtra Politics
Weather Update : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पुढचे 48 तास महत्त्वाचे, राज्यातील काही भागात पावसाची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.