'मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत सेनेसोबतच असणार आहे'
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरुद्ध बंड पुकारल्याने राजकीय हालाचालींना वेग आला आहे. शिवसेना आमरांसह शिंदे सध्या गुवाहटी येथे आहेत. याच पार्श्वभूमीवर आता कोकणातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे पुत्र योगेश कदमही गुवाहाटीला गेले आहेत. कदम हे मध्यंतरी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यासंदर्भात आता रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत सेनेसोबतच असणार आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
ते म्हणाले, मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मागील काही दिवसांपूर्वी रामदास कदम हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. या चर्चांनाही आता राम कदम यांनी पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, रामदास कदम हे 2005 ते 2009 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून रामदास कदमांना महाराष्ट्र ओळखायचा. 2005 मध्ये त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या रामदास कदमांचा 2009 मध्ये मात्र पराभव झाला होता. तेव्हा रामदास कदमांचं काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. 2010 मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.