आयुष्याची संध्याकाळ अंधारमय, रामदास कदम ढसाढसा रडले

आयुष्याची संध्याकाळ अंधारमय, रामदास कदम ढसाढसा रडले
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेतील अनेकांनी शिवसेनेला रामराम करत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचीदेखील शिवसेनेतून काल हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आज त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांना आश्रू अनावर झाले. 52 वर्षे मी कामं केलं पण माझ्यावर नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आयुष्याची संध्याकाळ अंधारमय होईल असं कधीच वाटलं नव्हतं हे सांगताना रामदास कदम भावूक झालेले पाहायला मिळाले. (Ramdas Kadam Latest News In Marathi)

आयुष्याची संध्याकाळ अंधारमय, रामदास कदम ढसाढसा रडले
Aditya Thackeray Mumbai Rain | परफेक्ट नियोजनामुळे मुंबई तुंबली नाही, असं तुम्हाला वाटतं का ?

52 वर्षे काम करणाऱ्या एका शिवसैनिकावरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचे आपण आत्मपरिक्षण केले पाहिजे असेही रामदास कदम म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडलं. पक्षाच्या कारवाईनंतर मी खूप अस्वस्थ असून, राजीनामा दिल्याने मी समाधानी नाही, आनंदी नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. एखाद्या पक्षासाठी 52 वर्षे लढणारा नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येते याचा विचार करायला हवा असेही ते म्हणाले.

शिवाजीराव अढळराव पाटील, आनंद अडसूळ आणि आता शेकडो नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत त्यांचीदेखील हकालपट्टी करणार आहात असा प्रश्नदेखील कदम यांनी याावेळी उपस्थित केला. तसेच मातोश्रीवर बसून एवढंच काम शिल्लक राहिलं आहे का? असा खोचक टोलादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला. हकालपट्टी करण्याची वेळ का आली आहे याचं आत्मचिंतन करा असा सल्लादेखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

आयुष्याची संध्याकाळ अंधारमय, रामदास कदम ढसाढसा रडले
शिवसेना संपवण्याचे काम पवार काका पुतण्यांनी केलं- रामदास कदम

राणे, राज ठाकरे, छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी संघर्ष केला आणि ते आज माझी हकालपट्टी करतात. असं म्हणत रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या आमदारावरील टीकेवर बोट ठेवले. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर आदित्या ठाकरेंनी किती प्रकारची टीका केली, असे म्हणत त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवावे असे रामदास कदम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.