सावरकरांबद्दल चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (ranjit savarkar grandson vinayak savarkar filled case Rahul Gandhi Speaks Against Savarkar )
सावरकरांबद्दल चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आज दादर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे हेदेखील जाणार आहेत अशी माहिती रणजीत सावरकर यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.
हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?
राहुल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य...
सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार?
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी राहुल गांधींवर परखड भाषेत टीका केली होती. सावरकरांचा अपमान पाहात ठाकरे यांनी तलवार म्यान का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा २०१९ चा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये १८ सप्टेंबर २०१९ ला विधानसभेचा प्रचार करताना उद्धव ठाकरे यांनी 'राहुल गांधी समोर दिसले तर त्यांना जोडे मारले पाहिजे'. असं म्हटले होते. आज जर त्यांच्यासमोर राहुल आले तर ते २०१९ च्या विधानावर ठाम राहतील का? असा प्रश्न हिंदूत्वावादी संघटना विचारत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.