Ranjitsinh Disle : होमवर्क न देण्याचा निर्णय पालकांना आवडेल यात शंका; डिसले गुरुजींचं मत

विद्यार्थ्यांना होमवर्क न देण्याचा निर्णय योग्य, असं म्हणत त्यांनी या निर्णयाचं समर्थनही केलं आहे.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh DisaleSakal
Updated on

विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मिळणारा होमवर्क बंद करण्याचा विचार सध्या राज्य सरकार करत आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याविषयीचे संकेतही दिले आहेत. राज्य सरकारच्या या धोरणावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच ग्लोबल टीचर डिसले गुरुजींनी शिंदे फडणवीस सरकारच्या या धोरणाचं स्वागत केलं आहे. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी असे निर्णय गरजेचे असल्याची प्रतिक्रिया रणजितसिंह डिसले यांनी दिली आहे.

Ranjitsinh Disale
गृहपाठ बंद करण्याचा विचार; शिक्षणमंत्री केसरकर

शिंदे फडणवीस सरकारने आता होमवर्क बंद करण्याच्या निर्णयावर विचार सुरू केला आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून याविषयी अंतिम निर्णय घेणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलं आहे. विद्यार्थ्यांवरचा अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या हेतूनं या धोरणाचा विचार चालू असल्याचंही केसरकर म्हणाले. दरम्यान, ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी या धोरणाचं समर्थन केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी या धोरणाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुलांच्या पाठीवरचं ओझं कमी करतानाच आता अभ्यासाचंही ओझं कमी करून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी असे निर्णय गरजेचे आहेत, असं डिसले म्हणाले आहेत. त्याचबरोबर असे निर्णय़ घेण्याआधी शिक्षकांना प्रशिक्षण देणं गरजेचं असल्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. पालकांना हा निर्णय कितपत आवडेल याबाबत शंका आहे, त्यामुळे असा निर्णय घेताना शिक्षक आणि पालकांना विश्वासात घ्यावं लागेल असं मतही डिसले यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.