पोलिस अधिकारी करायचे वसुली; तिघांवर खंडणीचा गुन्हा

या संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे तक्रार आली होती
Ransom case
Ransom caseटिम ई सकाळ
Updated on

मुंबई : तीन पोलीस अंगडिया व्यापाऱ्यांकडून पैसे उकळायचे. या संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे (Hemant Nagrale)यांच्याकडे तक्रार आली होती. आता अधिकाराचा गैरवापरकरून पैसे उकळणाऱ्या या तीन पोलिसांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.पोलिस निरीक्षक ओम वनघाटे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन कदम आणि पोलिस उपनिरीक्षक समाधान जामठाडे अशी आरोपी पोलिसांची नावे आहेत. (Ransom case filed against three policemen in mumbai)

Ransom case
कर्नाटकातील हिजाब वाद चिघळला! 58 विद्यार्थ्यांचं निलंबन

य़ा संदर्भात काही दिवसापूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर अतिरिक्त आयुक्त दक्षिण विभागीय दिलीप सावंत यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले होते. याप्रकरणी दिलीप सावंत यांनी तपास केला असता तीन पोलीस अधिकारी वसुलीसाठी सक्रिय असल्याचे तपासात निदर्शनास आले. त्यानंतर या तीन पोलिसांविरुद्ध एलटी मार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८४ आणि ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.