दानवेंचे आदित्य ठाकरेंना उत्तर; आम्ही शब्दावर तेव्हाही ठाम होतो...

आमच्यासोबत निवडणूक लढवून शिवसेनेने महाराष्ट्रभर मते मागितली आणि...
Raosaheb Danave
Raosaheb DanaveRavsaheb Danave
Updated on

नागपूर : आम्ही कुणाच्याही वाट्याला जात नाही. कायदा त्याचे काम करतो. त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करीत नाही. त्यांची कृत्य जशी आहेत, तशीच फळ त्यांना मिळत आहेत. त्यासाठी आम्हाला दोषी धरणे योग्य नाही. आम्हाला बोलण्याच्या आधी त्यांनी आपले आचरण सुधारावे. आम्ही जाणीवपूर्वक काहीही करीत नाही. आम्ही आमच्या शब्दावर तेव्हाही ठाम होतो आणि आजही आहोत, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (ravsaheb danawe) म्हणाले.

आमच्यासोबत निवडणूक लढवून शिवसेनेने महाराष्ट्रभर मते मागितली आणि ऐन सत्तास्थापनेच्या वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससारख्या विचारधारा न पटणाऱ्या पक्षांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही तर शिवसेनेनेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे उत्तर रावसाहेब दानवे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी गोव्यात केलेल्या वक्तव्याला दिले.

Raosaheb Danave
WHO प्रमुख म्हणाले, ...तर जून ते जुलैपर्यंत कोरोनाचा तीव्र टप्पा संपू शकतो

जनतेचा कौल भाजप (BJP) व शिवसेनेला (shivsena) होता. आम्ही तेव्हाही शब्दावरून फिरलो नाही, अन् आताही नाही. केवळ मुख्यमंत्र्याची खुर्ची येवढेच शिवसेनेचे लक्ष्य होते. तर राज्याचा विकास हे आमचे लक्ष्य होते. हा दगाफटका करून शिवसेनेने केवळ आमच्याच पाठीत खंजीर खुपसला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेशीसुद्धा बेईमानी केली, असेही रावसाहेब दानवे (ravsaheb danawe) म्हणाले.

रेल्वेमध्ये यापुढे शिजविलेले अन्न

रेल्वेमध्ये यापुढे डबाबंद अन्न दिले जाणार नाही, तर तेथे शिजविलेले अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन झालेले आहे. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे सरकारचे नियोजन आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारने विदर्भालाही भरभरून दिलेले आहे. वर्धा-नांदेड रेल्वे मार्गासाठी तीन हजार कोटी, वर्धा-बल्लारशासाठी १,८०० कोटी, वर्धा-नागपूरसाठी ६०० कोटी आणि नागपूर नागभिडसाठी ११४ कोटींची तरतूद केल्याचे रावसाहेब दानवे (ravsaheb danawe) यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.