खोतकरांना हवी जालना लोकसभेची जागा; दानवे म्हणाले 'बापाची जहागिरी थोडीच हे'

Raosaheb Danve and Arjun Khotkar
Raosaheb Danve and Arjun Khotkar
Updated on

औरंगाबाद : एकेकाळचे कट्टर विरोधक केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि माजीमंत्री अर्जुन खोतकर आता एकनाथ शिंदे गटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहे. खुद्द दानवे यांनीच राजकारणात कोणी शत्रु नसतं किंवा मित्रही नसतं, अस म्हटलं. त्यानंतर खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी खोतकर यांनी जालना लोकसभेची जागा मागितली. त्यावरून दानवे चांगलेचं संतापल्याचं दिसून आलं. त्यामुळे खोतकर-दानवे यांच्यातील वैर खरच संपलं का, असा प्रश्न उपस्थित होतं आहे.(Raosaheb Danve news in Marathi)

Raosaheb Danve and Arjun Khotkar
जालना : शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात

खोतकर म्हणाले होती की, खुद्द दावनेंनी मला लोकसभेला समर्थन द्या, तुम्हाला दुसरी जागा देता येईल. कारण ही जागा भाजपची असून मीच सध्या इथला विद्यमान खासदार आहे, असं म्हटलं. त्यावर मी त्यांना म्हटलं की, हा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाका. शिवाय, "तुम्ही अनेक वर्षे इथून लढलात आता ती मला लढवू द्या असं मी त्यांना म्हटल्याचही खोतकर यांनी सांगितलं.

दरम्यान खोतकर यांच्या जालना लोकसभेच्या जागेवरून रावसाहेब दानवे संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. दानवे म्हणाले की, जालना लोकसभेची जागा रावसाहेब दावनेच्या बापाची जहागिरी थोडीच आहे. याच्यावर अधिकार रावसाहेब दानवेंचा थोडाच आहे. उद्या आमच्या पक्षाचे सरचिटणीस मुलतानी हे देखील तिथून उभे राहू शकतात. ते आणि मी खुर्च्या टाकून जागांचं वाटप करत बसलो तर झालंच. तो काय जालन्यातला पक्ष आहे का असा सवाल करत भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याचं दावने यांनी म्हटलं.

Raosaheb Danve and Arjun Khotkar
रावसाहेब दानवेंसोबत खरंच हातमिळवणी केली का? खोतकर म्हणाले...

एकंदरीतच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दानवे-खोतकर यांच्यातील मतभेद खऱच दूर झाले की आणखी वाढणार असे प्रश्न उपस्थित होत आहे.

तत्पूर्वी पत्रकार परिषदेत खोतकर म्हणाले, आज सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी माझं सविस्तर बोलणं झालं. माझ्यावर ओढवेलली माहिती मी पक्षप्रमुखांना सांगितली. त्यानंतर मी संजय राऊतांशी बोललो. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी बोललो. मी ४० वर्षांचा सच्चा शिवसैनिक आहे. कुटुंबियांसाठी मला काही निर्णय करणं गरजेचं आहे, असं सांगताना मी उद्धव ठाकरेंची परवानगी मागितली. त्यानंतर मी आज शिवसैनिकांच्या साक्षीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()