समर्थ रामदासच शिवाजी महाराजांचे गुरू; दानवेंनी राज्यपालांना सावरलं

"आमच्यापेक्षा जास्त वाचणारा कुणी असेल तर..."; रावसाहेब दानवेंनी घेतली वादात उडी
Raosaheb Danve
Raosaheb DanveTeam eSakal
Updated on

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना केलल्या एका वक्तव्यानं सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. 'समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का?' असं वक्तव्य त्यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये केलं होतं. त्यावरून आता एक नवा वाद पेटला आहे. आज विधीमंडळात देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध सत्ताधारी महाविकास आघाडीने केला. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Budget Session 2022) पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांचे अभिभाषण पुर्ण होऊ शकल नाही, ते आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवून निघून गेले. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी राज्यपालांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे.

Raosaheb Danve
'चारशे कोटींचा घोटाळा; तीन नेते, तीन अधिकाऱ्यांसह पाच...', सोमय्यांचा आरोप

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांबद्दल आम्ही जे वाचलं, जे ऐकलं, त्या आधाराव आम्ही हे बोललो. आम्ही ज्या शाळेत शिकलो, ज्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं त्यावरून समर्थ रामदास हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू आहेत हीच आमची माहिती आहे. आमच्यापेक्षा कुणी जास्त वाचणारे कुणी असतील, त्यांच्या वडीलांनी त्यांना जास्त माहिती दिली असेल तर त्यांचं मत आहे असं रावसाहेब दानवे म्हणाले.

Raosaheb Danve
आमदार रवी राणांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या होणार सुनावणी

काय म्हणाले होते कोश्यारी?

कोश्यारी म्हणाले होते या देशात गुरु अशी परंपरा आहे, की ज्याला सद्गुरु मिळाला म्हणजे सगळं काही मिळालं आणि सद्गुरु नाही मिळाला तर काहीच मिळालं नाही. समर्थांच्या शिवाय शिवाजीला कोण विचारेल तरी का?' असं त्यांनी म्हटलंय. गुरुदक्षिणा म्हणून या राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं, असंही राज्यपालांनी दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.