महाविकास आघाडीतील आमदार आपल्या संपर्कात,भाजपच्या केंद्रीय मंत्र्याचा दावा

निवडणुकाजवळ आल्यावर नाराज आमदार भाजपमध्ये येतील.
Mahavikas
Mahavikasesakal
Updated on

जालना : भारतीय जनता पक्ष व शिवसेनेला मतदारांनी कौल दिला. मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हाच त्यांच्यातील भगवा रंग संपुष्टात आला, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनेवर केली आहे. आता त्यांनी हिरव्याचे पांघरुण घेतले आहे. भेसळ आमच्यात आहे की त्यांच्यात असा सवाल दानवे यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) केला. राऊतांनी भाजपचा भगवा भेसळीचा असल्याची टीका केली होती. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक आमदार नाराज आहेत. (Raosaheb Danve Claims, Many MLAs Of Mahavikas Aghadi Contact With Us)

Mahavikas
Anil Ambani | अनिल अंबानींना मोठा झटका, दिवाळखोरीतील कंपनीला वाचवण्यात अपयश

ते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा दानवेंनी केला. राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर आघाडीतील २५ आमदार बहिष्कार टाकणार होते, असा गौप्यस्फोट करत त्यांची समजूत काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकाजवळ आल्यावर नाराज आमदार भाजपमध्ये येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांची नावे सांगितली तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Mahavikas
मलिकांना पाठिंबा म्हणजे दाऊदला पाठिंबा : रावसाहेब दानवे

मात्र दुसरीकडे नागपूरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपचे बहुमत असलेले सरकार आणायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()