Video : 'BJPकडून शेण खाण्याची परंपरा सुरूच'; दानवेंनी शिवरायांच्या एकेरी उल्लेखाने NCP भडकली

raosaheb danve contravery statement Video on chhatrapati shivaji maharaj ncp amol mitkari tweet
raosaheb danve contravery statement Video on chhatrapati shivaji maharaj ncp amol mitkari tweet
Updated on

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलच तापलेलं आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. आता भाजपचे नेते केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याने वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहे.

या आधी शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं होतं यावरून वाद निर्माण झाला होता. हा विषय मागे पडत नाही त्याआधीच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे. दानवे यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे.

raosaheb danve contravery statement Video on chhatrapati shivaji maharaj ncp amol mitkari tweet
Dehu Sansthan : शुभेच्छा देताना 'तुका म्हणे' वापरू नका, अन्यथा…'; देहू संस्थानाचा तरूणांना इशारा

या व्हिडिओनंतर अमोल मिटकरी यांनी या व्हिडिओची क्लिप शेअर करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मिटकरी म्हणाले की, "भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली. आत्ता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचा "शिवाजी" असा एकेरी उल्लेख.. भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली, याचा आणखी एक पुरावा." असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी दानवे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी देखील केली आहे.

raosaheb danve contravery statement Video on chhatrapati shivaji maharaj ncp amol mitkari tweet
मोदींचं कॉंग्रेसबद्दल विधान अन् शरद पवारांच्या डोळ्यात पाणी; आव्हाडांनी सांगितला किस्सा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.