बाहेर देशातून कोळसा आणावा, वीज टंचाईवर दानवेंचा ठाकरे सरकारला सल्ला

बाहेर देशातून कोळसा आणावा
raosaheb danve
raosaheb danvesaka
Updated on

जालना : राज्यावर भारनियमनाचे संकट सुरु आहे. पुरेसा कोळसा नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यावरुन राजकीय वाद सुरु झाला आहे. केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्यातील वीज संकटासाठी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. दानवे म्हणाले, राज्यांना कोळसा पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. ती केंद्राने पार पडली आहे. ज्या वेळी केंद्राकडे कोळसा उपलब्ध होता, त्यावेळी राज्य सरकारने कोळशा घेऊन त्याची साठवणूक केली नाही. (Raosaheb Danve Criticize Thackeray Government Over Electricity Shortage)

raosaheb danve
काळजी, दगदग नको करु ! तब्येतीला जप, पंकजा यांचा भाऊ धनंजय मुंडेंना सल्ला

कोळसा संपत आल्यानंतर राज्य केंद्र सरकारच्या नावाने ओरडत असेल तर त्यांनी दुसऱ्या देशातून कोळसा आणावा, असा अजब सल्ला दानवे यांनी राज्य सरकाला दिला आहे. केंद्राकडून राज्यांना बाराशे ते दोन हजार रुपये या दराने कोळसा पुरवठा केला जातो. केंद्राने सतत राज्यांना कोळशाची साठवणूक करण्याची सूचना केली होती. मात्र महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने तसे काही केले नाही. यातूनच राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

raosaheb danve
मोबाईलच्या बॅटरीला डिटोनेटर जोडल्याने मोठा स्फोट, दोन मुले गंभीर जखमी

शेतकरी व उद्योजकांची गरज लक्षात घेऊन राज्याने कोळशाची साठवणूक करायला हवी होती. मात्र सरकारच्या नियोजनशून्य कामामुळे राज्यात वीजपुरवठ्याचे नियोजन होऊ शकले नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()