'पटोलेजी केंद्राचे राज्याकडे कोट्यवधी थकित आहेत, त्याचाही हिशोब करूयात'

आधीच राज्यात संभ्रम आहे त्यात भर घालू नका - रावसाहेब दानवे
political
politicalesakal
Updated on
Summary

आधीच राज्यात संभ्रम आहे त्यात भर घालू नका - रावसाहेब दानवे

राज्यासह केंद्रातील राजकीय वातावरण सध्या गढुळ झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील टोलेबाजी आणि आरोपप्रत्यारोपामुळे हे वातावरण आणखीन तापलं आहे. दरम्यान, कॉंग्रसेचे नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्राचे ८०० कोटी रुपये रेल्वे खात्याने घेतले असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावर आता रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी प्रतित्त्युर दिले आहे.

political
पुण्यात ISIS चे हस्तक? कोंढव्यात तत्काळ सर्च ऑपरेशन

मंत्री दानवे म्हणाले, कॉंग्रसेचे नाना पटोले यांनी केंद्राचे ८०० कोटी रुपये रेल्वे खात्याने घेतेल असल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यांना सांगू इच्छितो की, आधीच राज्यात संभ्रम आहे त्यात भर घालू नका. राज्य आणि केंद्र सरकराने ज्या एमयुवर सही केली त्यानुसार १००० कोटी रुपये राज्याने (Maharashtra Govt.) केंद्राला द्यायचे होते. मात्र त्यातील केवळ ८०० कोटी आले आहेत, उर्रवरित २०० कोटी बाकी आहेत. त्यामुळे हा करार करुन हा विषय मार्गी लावा. केंद्र आणि राज्य मिळून जो करार झाला आहे ते केंद्र सरकार (Central Govt) आणि रेल्वे खाते पहायला तयार आहे, असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्याप्रमाणे केंद्राचेही अनेक विषय बाकी आहेत. रेल्वे खात्याचे काही पैसे राज्याकडे बाकी आहेत, त्याचा हिशेब राज्यसरकारमधील कोणीही नेता सांगत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्याला मंजूर कलेल्या एकूण रकमेच्या ६, ३६५ कोटी रुपये राज्य सरकारकडून केंद्राला येणे बाकी असल्याचेही त्यांनी यावेळ सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.