Wadettivar Vs Danve: जागा मिळवण्यासाठी दानवेंनी पाडलं गरीब कुटुंबाचं घर! वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीनं घर उध्वस्त केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Raosaheb Danave
Raosaheb Danave
Updated on

नवी दिल्ली : भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जमीन मिळवण्यासाठी आपल्याच गावातील एका गरीब कुटुंबांचं घर जमीनदोस्त केल्याचा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर या कुटुंबाला दानवे यांनी मारहाण केल्याचंही त्यांनी आरोप करताना म्हटलं आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती देणारं ट्वीट वडेट्टीवार यांनी केलं असून पीडितांचा आक्रोश दाखवणारा व्हिडिओही ट्विट केला आहे. (Raosaheb Danve demolished poor family house to get a piece of land serious allegation by Vijay Wadettivar)

वडेट्टीवारांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी संत्रे कुटुंबाला केलेली मारहाण म्हणजे सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना मिळालीच पाहिजे. मालकाने जमीन देण्यास नकार दिला तर घर जबरदस्तीने पाडून कुटुंबाला मारहाण करण्यात येते.

गरीब बहुजन कुंभार समाजातील असलेले संत्रे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला रावसाहेब दानवे आणि भाजपच्या गुंडांकडून त्रास दिला जातो, मारहाण केली जाते. भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.

Raosaheb Danave
"मोदी देव आहेत तर त्यांचं मंदिर बांधू अन् प्रसाद म्हणून ढोकळा चढवू"; ममता बॅनर्जींची टोलेबाजी

पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे?

दानवे आणि त्यांचा आमदार पुत्र संतोष दानवे यांच्या गुंड कार्यकर्त्यांना आता जवखेडा गाव कंटाळलं आहे. मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियांनी त्यांच्यावर केला आहे. जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम. साठी रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीनं आपलं घर उध्वस्त केल्याचा आरोप पीडित संत्रे कुटुंबानं केला आहे.

Raosaheb Danave
T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

अज्ञात आठ ते दहा जणांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उध्वस्त केल्याची घटना रावसाहेब दानवेंच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी आज्ञात आठ ते दहाजणा विरुद्ध संत्रे कुटुंबियांना मारहाण करून त्यांचं घर उध्वस्त केल्याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. परंतु हा तपास समाधानकारक नाही.

Raosaheb Danave
Azam Khan : आझम खानला दहा वर्षांची शिक्षा; डुंगरपूर केसमध्ये कोर्टाने ठोठावला १४ लाखांचा दंड

हाय वे जात असताना स्वतःच्या जमिनी, घर वाचवायचं पण दुसऱ्यांची जमीन घ्यायची ही सत्तेतील मस्ती आहे, आम्ही ही मस्ती उतरवणार. संत्रे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. या कुटुंबाला काही झालं तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबानं दानवे यांचं नाव घेतलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी वडेट्टीवार यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.