CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी अन् रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत विधान; म्हणाले...

CM Eknath Shinde
CM Eknath Shindeesakal
Updated on

नवी दिल्लीः २०१९पासून राज्यातल्या जनतेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. कधी पहाटेचा शपथविधी होतो तर कधी महाविकास आघाडीची स्थापना होते. तर कधी शिवसेनेत बंड होतं आणि नवं सरकार सत्तेत येतं.

आता २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाला. अजित पवार यांच्यासोबत ३५ पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार गटाच्या ९ आमदारांना राज्यात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

CM Eknath Shinde
Manipur Violence : मणिपूरमध्ये आणखी दोन तरुणींवर अत्याचार; जमावाने केली निर्घृण हत्या

अजित पवार राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होत आहे. एकनाथ शिंदेंकडे असलेले मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे जाईल, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. त्यातच आज एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे शिंदेंच्या पदाचा धोका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं होतं. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक विधान केलं आहे.

CM Eknath Shinde
Anna Hazare on Manipur: मणिपूरच्या 'त्या' भीषण घटनेवर अण्णा हजारेंचा संताप; म्हणाले, त्यांना...

रावसाहेब दानवे म्हणाले की, सध्या तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच उपमुख्यमंत्री असणार आहेत. यामध्ये कसलाही बदल होणार नाही. परंतु निवडणुकीनंतर काय परिस्थिती निर्माण होते, त्यावर एनडीएमधील नेते चर्चा करुन निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दावनेंनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.