Mahadev Jankar: ‘सत्ता येते जाते पण..’, तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखल्याने जानकर संतापले

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना तुळजाभवानी मंदिरात गर्भगृहात जाण्यापासून अडवण्यात आलं आहे
Mahadev Jankar
Mahadev JankarEsakal
Updated on

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना तुळजाभवानी मंदिरात गर्भगृहात जाण्यापासून अडवण्यात आलं आहे. महादेव जानकर यांना मंदिरातील गर्भगृहात जाण्यापासून सुरक्षा रक्षकांनी रोखलं त्यामुळे गाभाऱ्याच्या बाहेरून दर्शन घेऊन जानकर यांना माघारी परतावं लागलं.

आज महादेव जानकर यांची मशाल यात्रा आहे. त्यानिमीत्ताने ते तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. गेल्या काही दिवसांपुर्वी मंदिरात काही नवे नियम जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत. मंदिरापासून काही अंतरावर वाहने थांबवावी लागतात. त्या ठिकाणाहून चालत जावे लागते. त्याचबरोबर गर्भगृहामध्ये दर्शनासाठी कोणाला सोडावं यावरतीही नवी नियमावली लागू केली आहे.

Mahadev Jankar
Ajit Pawar: ‘अजितदादांकडे गेलो मात्र.., त्या बैठकीशी माझा संबंध नाही’, शरद पवार गटाच्या आमदाराने सांगितलं भेटीचं कारण

तर गेल्या काही दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीराजे छत्रपती हे दर्शनासाठी आले होते. तेव्हाही असाच वाद निर्माण झाला आहे. आजही महादेव जानकर यांना गर्भगृहात जाण्यापासून रोखलं आहे.

तर व्हीआयपी नेत्यांना अनेकदा दर्शन दिलं जातं, त्यामुळे भाविकांना ताटकळत उभं राहावं लागतं. तर काही मंदिरांमध्ये त्याबाबतीतही भेदभाव केला जातो अशा चर्चा असतात. त्या मंदिरात ठराविक पक्षांची नेतेमंडळी आली तर त्यांना गर्भगृहात प्रवेश मिळतो, असा आरोप होत असतानाच आज पुन्हा महादेव जानकर यांच्याबाबतीत असं घडलं आहे.

Mahadev Jankar
Mahira Khan Wedding: आईच्या दुसऱ्या लग्नात लेकाला अश्रू अनावर! माहिरानं शेयर केला खास व्हिडिओ

जानकर मंदिरात आले, त्यांना गर्भगृहात जाऊन दर्शन घ्यायचं होतं. पण, त्यांना सुरक्षारक्षकांनी अडवलं आहे. तर जानकर यांच्यामध्ये आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी दर्शन घेतलं आणि ते परत आले. सर्वांसाठी एकच नियमावली आहे. हे पुन्हा पुन्हा दर्शनाच्या वादाने दिसून येत आहे.

महादेव जानकरांची प्रतिक्रिया

अशी मग्रुरी आम्ही चालू देणार नाही. आम्ही पण राज्यातील आहोत. हि आमचीही देवी आहे. तुम्ही म्हणजे कोण. आज चांगला दिवस असताना  त्यात वाद नको म्हणून आम्ही बाहेरून पाया पडलो. बाहेर आरती केली. असं करणं योग्य नाही. मोठ्यांचा मान ठेवला पाहिजे. मी आधी इथला पालकमंत्री होतो. या मंदिराचा मी देखील ट्रस्टी होतो. त्यामुळे त्यांनी वागताना माणसं बघून वागावं. सत्ता येत असते जात असते. उद्या आम्ही सत्तेत असणार तेव्हा हे कुठे जातील असंही जानकर म्हणाले आहेत.

जानकर म्हणाले प्रशासनाने जनेतचे सेवक काेण आहेत हे तपासावे. आम्ही जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यभर, देशभर फिरत असताे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहाेत. याेग्य पद्धतीने मान सन्मान राखला पाहिजे. सत्ता येते आणि जाते हे त्यांनी लक्षात ठेवावे असेही जानकर यांनी नमूद केले.

Mahadev Jankar
Pune News : पुण्यातील ससूनमधून पळालेल्या ड्रग्स पेडलर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; पुणे पोलिसांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.