ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार; महत्त्वाच्या प्रकरणांचा CBI करणार तपास

महाराष्ट्रात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीसांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केले आहेत.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra FadnavisSakal Digital
Updated on

Rashmi Shukla Phone Tapping Case : रश्मी शुक्लांना अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणाशी संबंधित तपास मुंबई पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाकडे वर्ग करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी मुंबई आणि पुणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यात तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्य साक्षीदार असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता.

Eknath Shinde Devendra Fadnavis
बंगालमध्ये ED ची मोठी कारवाई; TMC नेत्याच्या मैत्रिणीकडून 20 कोटी जप्त

फडणवीस यांच्यासह पोलिस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी रश्मी शुक्ला यांच्यासर शिवसेना नेते संजय राऊत, राष्टवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांचेही जबाब नोंदवण्यात आले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते, तर पुणे पोलिसांनी मात्र अद्याप दोषारोपपत्र दाखल केलेले नव्हते.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde : २७ पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार अशक्य?

त्याचबरोबर जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवत मारहाण करीत पाच लाखांची खंडणी घेण्यात आली. याप्रकरणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगावमधील 29 जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपासही सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेशही सरकारने दिले असल्याचे सूत्रांनी म्हटले असून याची कागदोपत्री पूर्तता होणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.