Dasara Melava : रश्मी ठाकरेंचा वाढदिवस अन् ठाकरेंना मिळाली मेळाव्याची 'गोड' बातमी

उद्धव ठाकरेंच्या राजकीय यशामागे रश्मी ठाकरेंचं मोलाचं योगदान असल्याचं मानलं जातं.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sakal
Updated on

Dasara Melava News : गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली त्यात कोर्टाने उद्धव ठाकरेंना येत्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच आवाज घूमणार आहे. कोर्टाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा आणि दिलासा देणारा आहे. त्यात आज उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस देखील आहे. अशातच शिवाजी पार्कवर सेनेच्या मेळाव्याला परवानगी मिळाल्याने रश्मी ठाकरेंचा वाढदिवस ठाकरेंसाठी खास ठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Uddhav Thackeray
Dasara Melava: शिंदे गटाने शिवसेनेच्या मार्गात काळी मांजरे सोडणं बंद करावं : शिवसेना

दादर-डोंबिवली प्रवास अन् सुरू झाली लव्हस्टोरी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. उद्धव ठाकरेंच्या राजकीय यशामागे त्यांचं मोलाचं योगदान असल्याचं मानलं जातं.

डोंबिवलीच्या पाटणकर कुटुंबात रश्मी ठाकरेंचा जन्म झाला. माधव पाटणकर असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. मुलुंडच्या वझे केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. १९८७ साली त्या एलआयसीमध्ये नोकरी करू लागल्या. एलआयसीमध्ये असतानाच राज ठाकरेंच्या बहीण जयवंती ठाकरे यांच्याशी रश्मी ठाकरेंची ओळख झाली. जयवंती यांनीच रश्मी आणि उद्धव यांची भेट घडवून आणली.

Uddhav Thackeray
Ambadas Danve: 'गटप्रमुख मेळावा तो सिर्फ झाकी है, दसरा मेळावा अभी बाकी है'

उद्धव ठाकरे त्यावेळी फोटोग्राफी करायचे, राजकारणात सक्रीय नव्हते. रश्मी आणि उद्धव यांच्या ओळखीचं रुपांतर पुढे मैत्रीत झालं आणि मग ते प्रेमात पडले. उद्धव रश्मी यांना भेटायला वारंवार डोबिंवलीला जायचे. त्यानंतर अखेर १३ डिसेंबर १९८९ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. आज या दोघांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून आमदार आहेत. तसंच त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणूनही कामकाज पाहिलं आहे. तर तेजस ठाकरे सध्या शिकत असून त्यांच्याही राजकारणातल्या प्रवेशाची चर्चा आता सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.