Mahadev Jankar : सत्तेची घमेंड त्यांच्या डोक्यात शिरलीये, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार; जानकरांचा घणाघात

'सामान्य जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे दिसते.'
Mahadev Jankar
Mahadev Jankaresakal
Updated on
Summary

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत गेलेले सगळे लोक सत्ता गेल्यास कुठे जातील, हे कळणारही नाही.

विटा : भाजपप्रणित 'एनडीए' आघाडी (NDA Alliance) आम्हाला गृहित धरत नाही. काँग्रेस पक्ष (Congress) हा गद्दार, तर भाजप महागद्दार आहे, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केली. जनस्वराज्य यात्रेनिमित्ताने ते विटा येथे आले होते.

Mahadev Jankar
NCP चा बालेकिल्ला असणारा 'हा' मतदारसंघ शरद पवार शिवसेनेला सोडणार? लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही

त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री जानकर म्हणाले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत गेलेले सगळे लोक सत्ता गेल्यास कुठे जातील, हे कळणारही नाही. सामान्य जनता मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमवेत असल्याचे दिसते. मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. काँग्रेस पक्षाचे नेते शहाणपणाने वागले, तर त्यांना चांगले दिवस येतील.

काँग्रेस गद्दार व भाजप हा महागद्दार आहे. हे सत्तेत येत नव्हते, तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती; त्यावेळी आमच्याशी युती करून मते मिळवून त्यांनी सत्ता हस्तगत केली. मात्र, नंतर सत्तेची घमेंड त्यांच्या डोक्यात शिरली. चूक त्यांची नाही, तर आमचीही आहे. जो तो त्यांचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.

Mahadev Jankar
Kolhapur : दोन्ही मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार विजयी होता कामा नये; उद्धव ठाकरेंच्या सक्त सूचना

आम्हालाही तेच करावे लागेल. म्हणूनच राज्यात फिरून, जनतेत जाऊन मते आजमावत आहे. काँग्रेसने त्या-त्या काळात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. आता भाजपही तेच करीत आहे. त्यामुळे दोघांपासून समान अंतरावर राहून आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून युती करावी, असे नेतृत्व ना काँग्रेसकडे ना भाजपकडे आहे. त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचे याचा निर्णय त्या त्या वेळी आमच्या पक्षाचं पार्लमेंट बोर्ड घेईल, असंही त्यांनी सांगितलं.

Mahadev Jankar
NCP Crisis : पुन्हा नव्याने संघटना उभारण्यासाठी अजितदादा मैदानात; कोण-कोण लागणार गळाला? उत्सुकता शिगेला

'वापरा आणि फेकून द्या' या सध्याच्या धोरणामुळे भाजप कधी संपून जाईल, हे सांगता येणार नाही. आम्ही ठरविले आहे. आता कुणाच्या मागे लागायचे नाही. ज्यांना गरज असेल ते स्वतःहून मागे येतील, असंही जानकर यांनी स्पष्ट केलं. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी हारुगडे, रासपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील, बाळासाहेब मेटकरी, प्रणव हारुगडे, महेश मेटकरी, बबन हारूगडे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()