Ratan Tata Birthday : फक्त वडिलांच्या इच्छेखातर आर्किटेक्ट रतन टाटा बनले इंजिनियर, जाणून घ्या यशोगाथा

नवल टाटा यांची इच्छा होती की रतन टाटा यांनी इंजिनियर व्हावं
Ratan Tata
Ratan TataSakal
Updated on

Ratan Tata Birthday : प्रत्येकजण लहानपणी स्वप्न पाहतो की तो मोठा होऊन डॉक्टर, इंजिनियर, पायलट, शास्त्रज्ञ बनू किंवा काहीतरी करण्याचा विचार करतो ज्यामुळे त्याची वेगळी ओळख होईल. पण अनेकदा आयुष्यात अशा काही प्रसंग येतात ज्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. अशा परिस्थितीत त्यांना वेळेनुसार काम करावे लागते. 

असे असूनही ते त्या क्षेत्रात असे करतात की त्यांच्या कामाचे कौतुक होते आणि जग त्यांच्याकडे आदराने पाहते. अशा लोकांमध्ये भारताचे यशस्वी उद्योजक रतन टाटा यांचा समावेश होतो. रतन टाटांचा आज वाढदिवस असून ते 86 वर्षांचे आहेत.

Ratan Tata
Somnath Temple : सोमनाथ मंदिरात आहे असा एक रत्न ज्याच्या स्पर्शाने दगड सुद्धा सोन्यात बदलतो

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. वास्तुविशारद बनण्याचे रतन टाटा यांचे बालपणीचे स्वप्न होते. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सोनू टाटा होते. नवल टाटा हे जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा होते. रतन टाटा हे त्यांचे दत्तक घेतलेला मुलगा होता. जमशेदजी टाटा हे टाटा कंपन्यांचे संस्थापक होते.

Ratan Tata
Maharashtra Assembly Winter Session : अधिवेशन कधी घ्यायचं आणि संस्थगित करायचं हे कसं ठरतं ?

नवल टाटा यांची इच्छा होती की रतन टाटा यांनी इंजिनियर व्हावं. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी इंजिनियरिंगला करियर म्हणून निवडलं. काही दिवसांपूर्वी फ्युचर ऑफ डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन या विषयावर आयोजित ऑनलाइन सेमिनारमध्ये त्यांनी स्वतः या गोष्टी सांगितल्या.

Ratan Tata
Resolution 2023 : उज्वल भविष्यासाठी 2023 मध्ये कराव्यात अशा 23 गोष्टी; प्रभू गौरांगा दास यांचा सल्ला

1948 मध्ये रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचे घटस्फोट झाले. आणि त्यानंतर, त्यांचे पालनपोषन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. त्यांनी चॅम्पियन स्कूल, मुंबई येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि आर्किटेक्ट होण्याच्या इच्छेने रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.

Ratan Tata
Maharashtra Karnataka Border : या पहिलवानाने स्वीकारलेलं बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी पहिलं हौताम्य

 कॉर्नेल विद्यापीठातून 1956 मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना वास्तुविशारद क्षेत्रात करिअर करायचे होते. वास्तुकलेतून मानवतेला समजून घेण्याची प्रगल्भ जाणीव निर्माण होते, असे त्यांचे मत आहे. स्थापत्यकलेची त्यांना उत्कंठा असल्याने यातूनच प्रेरणा मिळाली.रतन टाटा सांगतात की, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी इंजिनिअर व्हावे. म्हणून मी माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकीचा कोर्स केला आणि इंटर्नशिपसाठी टाटा स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमध्ये आलो. 

Ratan Tata
Mens Bracelets Fashion : मुलींमध्ये सर्वात जास्त चर्चा असलेले मेन्स ब्रेसलेट!

पण मी वास्तुविशारद होऊ शकलो नाही याची खंत नाही. मला खंत एवढीच आहे की, पदवी पूर्ण करूनही मी माझ्या स्वप्नातील नोकरीसाठी प्रॅक्टिस करू शकलो नाही. रतन टाटा 1961 मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि 1991 मध्ये त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. डिसेंबर 2012 पर्यंत त्यांनी या गटाचे नेतृत्व केले. सध्या ते टाटा समूहाच्या अंतरिम अध्यक्षपदावर आहेत. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रतन टाटा टाटा स्टीलच्या कारखान्यातील चुनखडी काढायचे आणि ब्लास्ट फर्नेस हाताळायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.