भाजपाचे आमदार रवी राणा यांच्यावरील गुन्ह्यासंदर्भात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा महत्वाच्या काही मुद्द्यांवरून अधिवेशनाच्या सुरवातीपासूनच वातावरण तापलं आहे. भाजपाचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावरील गुन्ह्यासंदर्भात त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्री वळेस पाटील (Dipil Walse Patil) यांच्या फोननंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचा गौफ्यस्फोट त्यांनी केला आहे. आजच्या घडीला आर. आर. पाटलांसारखे गृहमंत्री (R.R.Patil) असते तर परिस्थिती वेगळी असती, असे म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला आहे.
अमरावतीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुतळा हटवण्याच्या प्रकरणावरून रवी राणा आक्रमक झाले. यावेळी ते म्हणाले, मनपा आयुक्तांवर शिवभक्तांनी शाईफेक केली या घटनेचा मी निषेध करतो. मी दिल्लीत असताना माझ्यावर यासंदर्भातील गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्या आहेत. मी दिल्लीला असताना माझ्या घरात घुसून तपासणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांना फोन करुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांनी आदेश दिला, त्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्याचा पुरावाही माझ्याकडे असल्याचा गौफ्यस्फोट त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन करुन रवी राणांना अटक करण्याचे आदेश दिले. आणि त्यानुसारच पुढील कारवाई झाली आहे. आर. आर. पाटील यांच्यासारखे गृहमंत्री या राज्याला हवे, असेही ते म्हणाले. जर का वाझेसारखे पोलिस ऑफिसर या व्यवस्थेत काम करत आहेत तर तुमची परिस्थितीही अनिल देशमुखा यांच्यासारखी होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.