Ravikant Tupkar: गादी अन् उशी घेऊन रविकांत तुपकर कृषी कार्यालयात; 'ही' मागणी मान्य होईपर्यंत मुक्काम इथेच!

Pik Vima: शेतकऱ्यांनी नुकसान केल्याची तक्रार केल्यानंतर २५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा नियम असतांना ९ महिने झाले तरी जर शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही, मग कृषी विभाग काय करतो आहे, कंपनीवर कारवाई का करत नाही? असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित केला.
Ravikant Tupkar: गादी अन् उशी घेऊन रविकांत तुपकर कृषी कार्यालयात; 'ही' मागणी मान्य होईपर्यंत मुक्काम इथेच!
Updated on

बुलडाणा : गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्याची रक्कम का देत नाहीत? असा सवाल उपस्थित करत गादी, उशी व बॅग घेवून रविकांत तुपकर गुरुवार, दि. २६ सप्टेंबर रोजी कृषी कार्यालयात पोहचले. त्यांनी बुलडाणा जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयात "मुक्काम आंदोलन" चालू केले आहे. हक्काचा विमा तात्काळ जमा करा म्हणत तुपकरांनी जिल्हा कृषि अधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले.

विम्यासाठी सरकारकडून वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याच्या धोरणाचा निषेध तुपकर यांनी केला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा शब्द कृषी सचिवांनी याआधी दिला होता, तो शब्द सरकारने पाळला नाही, म्हणून तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शेतकऱ्यांनी नुकसान केल्याची तक्रार केल्यानंतर २५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा नियम असतांना ९ महिने झाले तरी जर शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही, मग कृषी विभाग काय करतो आहे, कंपनीवर कारवाई का करत नाही? असा सवाल रविकांत तुपकरांनी उपस्थित केला.

Ravikant Tupkar: गादी अन् उशी घेऊन रविकांत तुपकर कृषी कार्यालयात; 'ही' मागणी मान्य होईपर्यंत मुक्काम इथेच!
Pune Crime News: वनराज आंदेकर खून प्रकरणात मोठी अपडेट! पोलिस तपासामध्ये मध्य प्रदेश कनेक्शन आलं समोर

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे पडत नाहीत तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहोत असे म्हणत जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात अंथरून आणि पांघरून सोबत घेऊन जात रविकांत तुपकर यांनी मुक्काम आंदोलन चालू केले आहे.

तुपकरांनी मुक्काम आंदोलन चालू केल्याचे कळताच शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे, तर कृषी अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असून कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.