Ravikant Tupkar march towards Mantralay: सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सरकारच्या विरोधात लढा उभारला आहे. आपले अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेऊन हजारो शेतकऱ्यांसह ते मंगळवारी मुंबईकडे कुच करणार आहेत. गावागावातील कार्यकर्ते आणि शेतकरी मंत्रालयावर धडक देण्यासाठी सज्ज झाले असून आज ता.28 नोव्हेंबर रोजी सकाळी शेतकऱ्यांची ही फौज मुंबईकडे रवाना होणार आहे.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी मुंबईत मंत्रलयावर धडक देऊन मंत्रालय ताब्यात घेण्याचा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान पार्श्वभूमिवर बुलढाणा शहर पोलिसांनी तुपकरांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तर न्यायालयाने त्यांची अटक कायदाबाह्य ठरवून त्यांची सुटका केली होती. तेव्हापासून तुपकरांनी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते.
दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी तिसऱ्या दिवशीही तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन सुरुच आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. परंतु तरीही आपले अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेऊन दिलेल्या इशाऱ्या प्रमाणे मुंबईत मंत्रालयावर धडक देणारच असा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला.त्यांच्या नेतृत्वात मुंबईकडे कुच करण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत.
आज मंगळवार (ता.28) रोजी सकाळी ८ वाजता सोमठाणा येथील आंदोलन स्थळावरुन ही फौज बुलडाण्याकडे निघणार आहे. बुलडाणा येथील स्वाभिमानी हेल्पलाईनसमोर सर्व कार्यकर्ते, शेतकरी जमा होणार असून तेथून सकाळी ९ वाजता हे सर्वजण मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.(Latest Marathi News)
तुपकरांची प्रकृती खालावली
आज २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून शुगर लेव्हल कमी झाली आहे शिवाय कमालीचा अशक्तपणा जाणवत आहे.
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमठाणा येथे आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांच्याशी चर्चा केली. सरकारमध्ये असलो तरी सरकार जमा नाही, असे सांगत हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई असल्याने या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सदाभाऊ खोत यांनी यावेळी जाहीर केले.
तसेच ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांनीही रविकांत तुपकरांशी चर्चा केली असून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यासोबतच राहुल बोंद्रे, पुरुषोत्तम खेडेकर, रेखाताई खेडेकर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, संघटनांनी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.