मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाणार की राहणार? शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाचे काय होणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सदरील गट विलीन होणार याबाबत चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे एकूण नऊ मंत्री हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाले आहेत. आता शिवसेनेचे (Shiv Sena) काय होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. आज शिवसेनेकडून कायदेशीर लढायची घोषणा करण्यात आली आहे. (Ready To Floor Test, Very Soon Will Return To Maharashtra, Says Rebel MLA Deepak Kesarkar)
तसेच शिंदे गटानेही १६ आमदारांच्या निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांना नोटीस पाठवून आपले म्हणणे उद्या सोमवारपर्यंत मांडण्यास सांगितले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) रविवारी (ता.२६) म्हणाले, की आमच्या गटाकडे बहुमत असून महाराष्ट्राच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठरावासाठी तयार आहोत. (Maharashtra Politics)
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत या कॅबिनेट मंत्र्यांव्यतिरिक्त एक किंवा आणखी दोन आमदार आमच्या गटात सामील होतील. त्यांच्या पाठिंबा आणि इतर अपक्ष यांच्यामुळे संख्याबळ ५१ पर्यंत जाते, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकार बरोबर जाणार नाही, असे ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.