मुंबई : कथीत कुचिक बलात्कार प्रकरणात पीडित मुलीनं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी कोणत्याही चौकशीला सामारं जायला मी तयार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. साम टिव्हीला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Ready to go before any inquiry Chitra Wagh reacts to the victim serious allegations in Kuchik Case)
चित्रा वाघ म्हणाल्या, मी जर तिच्यावर दबाब आणण्यास भाग पाडलं असेल तर यावर मी आणखी काय बोलू? ती हे का बोलते आहे? हेच मला कळत नाहीए. विद्या चव्हाण या डोक्यावर पडलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी बलात्काऱ्यांना पाठीशी घालते, असे आरोप माझ्यावर झाले होते, मग त्यावेळी कोण पुढं का आलं नाही? या प्रकरणी मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. कसल्या प्रकारचे गंभीर आरोप माझ्यावर झालेत मला तर काहीच समजत नाहीए"
"पीडित मुलीला मी फोन केला होता. आपल्याला लढायचे असेल तर काही गोष्टींची तयारी करावी लागेल. मी तिला मदतच केली आहे. आता हे सगळं कशासाठी होतंय हे काही मला माहिती नाही. ती मुलगी हे सगळं का करते आहे हे ही मला माहिती नाही. त्या मुलीला न्याय मिळावा ही माझी भूमिका होती. बाकी कोणताही हेतू माझा नव्हता. त्यामुळे जे आरोप होते आहेत त्याला मी उत्तर देईल. मी दबाव आणला असेल तर माझी चौकशी करा. माझी तयारी आहे" असंही चित्रा वाघ यांनी आरोपांना उत्तर देताना म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.