Girish Mahajan: फर्दापूरचं रेस्ट हाऊस अन् दारुचा बॉक्स; खडसे-महाजन भांडणाचं कारण आलं समोर! गोपीनाथ मुंडेंना करावी लागली होती मध्यस्थी

Eknath Khadse: ''त्यांच्या मोबाईलमधून जर क्लिप गायब झाली असेल तर माझी आणि त्यांची नार्को टेस्ट करा, पण हा विषय क्लिअर करा. कुठेही गेलं की ते माझ्याबद्दल घाणेरडं बोलत असतात, कारण ते माझ्या कामाबद्दल बोलू शकत नाहीत. त्यांची मानसिक अवस्था बिघडली आहे.''
Girish Mahajan: फर्दापूरचं रेस्ट हाऊस अन् दारुचा बॉक्स;  खडसे-महाजन भांडणाचं कारण आलं समोर! गोपीनाथ मुंडेंना करावी लागली होती मध्यस्थी
Updated on

Eknath Khadse: भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि भाजपच्या उंबरठ्यावर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातलं वैर सर्वश्रूत आहे. परंतु दोघांमधलं हे भांडण आजचं नाही. १९९६ पासून दोघांमध्ये भांडणं सुरु आहे. त्याला कारण ठरलं होतं संभाजीनगर जिल्ह्यातलं फर्दापूरचं रेस्ट हाऊस. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं आणि काय घडलं नव्हतं, याचा खुलासा खुद्द महाजनांनी केलाय. तेव्हा या दोन्ही नेत्यांमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांना मध्यस्थी करावी लागली होती.

'एबीपी माझा'वर बोलताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्यातल्या नात्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, खडसेंनी मागे सिडीची भाषा केली, त्यांना ईडी लागली पण त्यांनी कधीच सिडी बाहेर काढली नाही. त्यांचे जावईसुद्धा आतमध्ये जाऊन आले. वाट्टेल ते बोलण्याचा त्यांचा उद्योग आहे. मी त्यांना आवाहन करतो की सीडी दाखवा.. संभ्रम ठेऊ नका.

''त्यांच्या मोबाईलमधून जर क्लिप गायब झाली असेल तर माझी आणि त्यांची नार्को टेस्ट करा, पण हा विषय क्लिअर करा. कुठेही गेलं की ते माझ्याबद्दल घाणेरडं बोलत असतात, कारण ते माझ्या कामाबद्दल बोलू शकत नाहीत. त्यांची मानसिक अवस्था बिघडली आहे.'

Girish Mahajan: फर्दापूरचं रेस्ट हाऊस अन् दारुचा बॉक्स;  खडसे-महाजन भांडणाचं कारण आलं समोर! गोपीनाथ मुंडेंना करावी लागली होती मध्यस्थी
IND vs BAN: 'ऑफिसिअल ID है, बाकी सब फेक', शुभमन गिलने लाईव्ह सामन्यात उडवली सिराजची खिल्ली, Video Viral

महाजन पुढे म्हणाले, फर्दापूरच्या प्रकरणाबद्दल ते कायम बोलतात. फर्दापूरच्या रेस्ट हाऊसवर मी दारुचा बॉक्स नेला होता, मी टाईट होतो.. असं काहीतरी सांगत असतात. पण मी सांगतो, मी कधी दारु सोडा पण सिगारेट, तंबाखू घेत नाही. नॉन व्हेज खात नाही की चहा घेत नाही. तरी ते म्हणतात रेस्ट हाऊसवर नाचले, बाई घेऊ घेले होते.

महाजनांनी सांगितलं की, तेव्हा या प्रकरणाची एक बातमी खडसेंनी छापून आणली होती. त्यामुळे मी अस्वस्थ झालो आणि खडसेंना घेऊन मुंडे साहेबांकडे गेलो. या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, असं मी म्हटल्यानंतर औरंगाबाद सीपींनी त्याची चौकशी केली. आठ-दहा दिवसात रिपोर्ट आला. त्या प्रकरणात काहीही तथ्य नव्हतं, हे समोर आलं. तरीही ते हेच सांगत असतात. त्यांना माझ्याबद्दल बोलायला दुसरा विषय नाही, असं महाजन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.