चंद्रकांत खैरे म्हणाले, हॉटेलमधील जेवण पचत नाही, परत या मी मध्यस्थी करतो

Rebel MLAs contacted Chandrakant Khaire
Rebel MLAs contacted Chandrakant KhaireRebel MLAs contacted Chandrakant Khaire
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड पुकारणारे आमदार आता वैतागले आहेत. त्यांना शिंदे यांना सोडून परत यायचे आहे. यामुळे ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे खासदार संजय राऊत सांगत आहे. बंड पुकारणारे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्याशी भ्रमणध्‍वणीवर संपर्क साधला. यावेळी ‘हॉटेलमधील जेवण पचत नाही परत या मी मध्यस्थी करतो’ असे चंद्रकांत खैरे भ्रमणध्वणीवर बोलताना म्हणाले. (Rebel MLAs contacted Chandrakant Khaire)

शिवसेनेची बैठक पार पडल्यानंतर चंद्रकांत खैरे हे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना बंडखोर आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी संपर्क साधला आणि मदत मागितली. तसेच गुवाहाटीतून बाहेर काढण्याची विनंती केली. आमची मदत करा अशी विनंतीही बोरणारे यांनी खैरे यांना केली. तेव्हा त्यांनी सर्वांना मदत करणार नाही. आपल्या माणसांना मदत करणार असल्याचे सांगितले.

Rebel MLAs contacted Chandrakant Khaire
असदुद्दीन ओवैसींच्या मते महाराष्ट्रात सुरू आहे मर्कटनृत्य; आम्ही...

बाकीचे नाही तुम्ही कधी परत येता ते सांगा. मी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन जातो आणि मध्यस्थी करतो. हॉटेलमध्ये काय चालले आहे हे सर्व दिसत आहे. एकनाथ शिंदे एका व्हिडिओत वैतागलेले आम्हाला दिसले. तुम्ही लोक परत आल्यावर २० आमदार तरी शिवसेनेत परत येतील. किती दिवस हे चालणार आहे. हॉटेलमधील जेवण पचत नाही. हॉटेलचे खाऊन पोटात त्रास होते. परत या मी मध्यस्थी करतो, असे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) बोलताना बंड पुकारणारे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांना म्हणाले.

तुम्हाला लोकांनी निवडून दिले. शिवसेनेच्या नावावर तुम्हाला मतदान केले. यात तुमचीही मेहनत आहे. परंतु, ओळख शिवसेनेने आहे. लोकांचा विश्वास तुमच्यावर आहे आणि तुम्ही बंड केला. शिवसेनेसोबत बंडखोरी करणारे कुढे दिसत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही माझे चेले तर आहातच पण मित्रही आहात. मी बोलत तुमच्याशी. कधी येता ते फोन करून सांगा, असेही चंद्रकांत खैरे बोलताना म्हणाले.

Rebel MLAs contacted Chandrakant Khaire
ठाण्यात एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ सुपुत्र उतरले रस्त्यावर, केलं शक्तिप्रदर्शन

शिवसेनेतून फुटल्यावर असे होते

संजय राऊत यांच्या संपर्कात १५ ते २० आमदार आहेत. शिवसेनेच्या (shiv sena) नावावर लोकांनी मते दिली मग तुम्ही इकडेतिकडे कशाला जाता. आता बंड करणारे पंक्चर झाले आहेत. मध्यस्थी करा असे म्हणत आहेत. शिवसेनेतून फुटल्यावर असे होते. एका नगरसेवकाने असेच केले. आता तो बकरी चारायला घेऊन जातो. बंड करणारे राजकारणातूनच संपुष्टात येतात, असे खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मोठे केले

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मोठे केले. नारायण राणे व मनोहर जोशी यांना मोठे केले. आता हे लोक त्यांच्याच पक्षाला धोका देत आहेत. हे बरोबर नाही. ही लढाई आणखी १५ दिवस चालेल, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.