Maharashtra PWD Bharti : बांधकाम विभागाची भरती लांबणीवर; 1903 जागा रिक्त

Recruitment
Recruitmentesakal
Updated on

Construction Department Recruitment : राज्याच्या विविध विभागातील रिक्त जागांच्या भरतीबाबत राज्य शासन झपाट्याने निर्णय घेत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाची भरती जाहीर होऊन सहा महिने झाले तरी अद्याप जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. (Recruitment of construction department postponed maharashtra news)

कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या एकूण एक हजार ९०३ जागा भरण्यासाठी या विभागाने ‘टीसीएस’ कंपनीसोबत करारही केला. पण भरतीला मुहूर्त कधी लागणार, असा प्रश्न परीक्षार्थींनी उपस्थित केला आहे.

रिक्त पदे भरण्याबाबत राज्य सरकार वेळोवेळी जाहिरात प्रसिद्ध करत आहे. तलाठी, शिक्षक, आरोग्य विभागात मेगा भरती होत आहे. प्रक्रिया जलद गतीने होत असताना दुसरीकडे सहा महिने होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाची साधी जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही.

कनिष्ठ अभियंत्यांची ५३२ व स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची एक हजार ३७१ पदे भरण्यासाठी बांधकाम विभागाने १३ एप्रिल २०२३ ला ‘टीसीएस’सोबत करार केला. पात्र परीक्षार्थींची २०० गुणांची ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यांची निवड केली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Recruitment
Recruitment News: जलसंधारण अधिकाऱ्यांची भरती लांबली! 8 महिन्यांपासून समितीच्या निर्णयाची प्रतीक्षा

परीक्षेत बुद्धिमत्ता चाचणी, भाषा, गणित आदी विषयांचे प्रश्न विचारले जातात. या विभागात २०१९ पासून भरती झालेली नाही. त्यात आता कुठे भरती जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. पण सहा महिने होऊनही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे.

कसा होणार खड्डेमुक्त महाराष्ट्र

रस्त्यांची देखभाल- दुरुस्ती करण्याचे काम ठेकेदार करत असले तरी त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण असते. उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी हे कामाची तपासणी करतात.

महाराष्ट्रात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची भरती होत नसेल तर या विभागाकडून समाधानकारक कामाची अपेक्षा कशी करणार, असाही प्रश्न निर्माण होतो.

Recruitment
MPSC Bharti : एमपीएससीच्‍या विविध पदांसाठी अर्जाची या तारखेपर्यंत मुदत; विविध विभागातील पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.