Government Recruitment : सरकारकडून ‘लाख’ मोलाची नोकरभरती;उपमुख्यमंत्री फडणवीस; एक लाख पदांचा विक्रम

राज्य सरकारने सत्तेत आल्यावर ७५ हजार नोकर भरतीचा संकल्प केला होता, प्रत्यक्षात एक लाखापेक्षा अधिक सरकारी नोकर भरती करून राज्य सरकारने विक्रम केला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला.
Government Recruitment
Government Recruitment sakal

मुंबई : राज्य सरकारने सत्तेत आल्यावर ७५ हजार नोकर भरतीचा संकल्प केला होता, प्रत्यक्षात एक लाखापेक्षा अधिक सरकारी नोकर भरती करून राज्य सरकारने विक्रम केला असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला. पेपर फुटीवरुन विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह पसरवले जात असले तरी सुमारे ७० लाख उमेदवारांची परीक्षा गेल्या दोन वर्षांत घेण्यात आली. मात्र पेपरफुटीची एकही घटना घडली नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्यावेळी विरोधक राज्य सरकारचे उपक्रम, योजना याविषयी खोटे नरेटिव्ह पसरवत असल्याबाबत विरोधकांना खडे बोल सुनावत वस्तुस्थिती सभागृहासमोर मांडली. त्यानंतर त्यांनी मांडलेला राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने संमत केल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले.

यावेळी फडणवीस यांनी नोकरभरतीबद्दलची सविस्तर माहिती सभागृहाला दिली. फडणवीस म्हणाले, की आतापर्यंत ५७ हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर १९ हजारांहून अधिक उमेदवारांना एका महिन्यात आदेश मिळतील. ३१ हजार पदांच्या भरतीबाबत कार्यवाही सुरू असून येत्या तीन महिन्यांत त्यांनादेखील आदेश प्राप्त होतील. या माध्यमातून एक लाखांपेक्षा अधिक पदांची भरती केली असल्याचे सांगून हा विक्रम असल्याचे ते म्हणाले.

सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत, असे स्पष्ट करून शासकीय आणि महावितरणच्या आस्थापनांमध्ये ते बसविले जातील. यासाठी पाच कंपन्या पात्र ठरल्या असून त्यांना कार्यादेश दिले आहेत, असे ते म्हणाले. स्मार्ट मीटरचा करार मविआच्या काळातील असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्याची अर्थव्यवस्था ५०० अब्ज डॉलर

राज्यातील गुंतवणुकीविषयी फडणवीस यांनी साद्यंत माहिती सभागृहासमोर मांडत, महाराष्ट्र ५०० अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेच्या जवळ पोहोचला असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असल्याचेही सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com